राहेर येथे घरफोडी; गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:17 AM2021-05-22T04:17:59+5:302021-05-22T04:17:59+5:30
सध्या उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत असल्याने, ग्रामीण भागातील ग्रामस्थ छतावर किंवा घराचे द्वार उघडे करून घरात झोपतात. पोलीस सूत्रांनी ...
सध्या उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत असल्याने, ग्रामीण भागातील ग्रामस्थ छतावर किंवा घराचे द्वार उघडे करून घरात झोपतात. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राहेर येथील विष्णू काशीराम उगले हे गुरुवार रोजी रात्री घराचा मुख्यद्वार उघडे करून कुटुंबासह घरात झोपले होते. दरम्यान, दि. २० मे रोजीच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला. घरातील लोखंडी कपाटात ठेवलेली ७३ हजार रुपयांची रोकड लंपास करून पसार झाले. घटनेची माहिती मिळताच, चान्नी पोलीस स्टेशनचे प्रभारी ठाणेदार गुहिकर यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक गणेश नावकार, सुधाकर करवते, दत्ता हिंगणे, रावसाहेब बुधवंत, रवींद्र, प्रवीण सोनोने, आदींनी तत्काळ घटनास्थळ गाठून घटनेचा पंचनामा केला असून, अज्ञात चोरट्याला जेरबंद करण्यासाठी अकोला येथील शवन व फिंगर पथक यांना पाचारण करण्यात आले होते. या प्रकरणी विष्णू काशीराम उगले यांनी थेट चान्नी पोलीस स्टेशन गाठून दिलेल्या फिर्यादीवरून चान्नी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, प्रभारी ठाणेदार गुहिकर यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास रवींद्र व सुधाकर करवते करीत आहे. (फोटो)