व्याळाजवळ बर्निंग बसचा थरार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2017 01:56 AM2017-04-18T01:56:11+5:302017-04-18T01:56:11+5:30
व्याळा : धावत्या बसला आग लागल्याने प्रवाशांनी व्याळाजवळ बर्निंग बसचा थरार अनुभवला. ही घटना १७ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता घडली.
व्याळा : धावत्या बसला आग लागल्याने प्रवाशांनी व्याळाजवळ बर्निंग बसचा थरार अनुभवला. ही घटना १७ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता घडली. चालकाच्या ही बाब लक्षात आल्याने ३८ प्रवाशांचे प्राण वाचले. या घटनेमुळे राष्ट्रीय महामार्गावर दोन्ही बाजूने वाहनांची रांग लागली होती. तब्बल दोन तास वाहतूक विस्कळीत झाली होती.
खामगाववरून विनावाहक बस क्र.एमएच २० बीएल १८३२ ही अकोल्याकडे येत होती. रिधोरा ते व्याळादरम्यान पेट्रोलपंपाजवळ बस आल्यानंतर इंजीनमधून चालकाला पेट घेतल्याचे लक्षात आले. बसचे चालक सुरेश एकनाथ इंगळे यांनी गाडी रस्त्याच्या बाजूला थांबवली. बसमधील ३८ प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. थोड्यात वेळात इंजीनला लागलेली आग संपूर्ण बसमध्ये पसरली. यामध्ये बस जळून खाक झाली. ही बस राष्ट्रीय महामार्गावर जळत असल्याने दोन्ही बाजूने वाहनांची रांग लागली होती. या घटनेमुळे महामार्गावरील वाहतूक दोन तास विस्कळीत झाली होती. बाळापूर आणि अकोला येथून आग विझवण्यासाठी अग्निशमन बंबांना पाचारण करण्यात आले. विस्कळीत झालेली वाहतूक व्याळा पोलीस चौकीच्या कर्मचाऱ्यांनी सुरळीत केली.