लग्ण साेहळयात आलेल्या खासगी बसले घेतला पेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 19:00 IST2021-08-25T18:59:08+5:302021-08-25T19:00:22+5:30
Akola News : खासगी बसने अचाणक पेट घेतल्याची घटना बुधवारी दुपारी घडली़.

लग्ण साेहळयात आलेल्या खासगी बसले घेतला पेट
अकाेला : रिधाेरा येथील एका माेठया मंगल कार्यालयात विवाहासाठी आलेल्या खासगी बसने अचाणक पेट घेतल्याची घटना बुधवारी दुपारी घडली़. या घटनेची माहीती मीळताच अग्नीशमन विभागाने तातडीने घटनास्थळ गाठून आगीवर नियंत्रण मीळवीले़. मात्र ताेपर्यंत बसचे माेठया प्रमाणात नुकसान झाले असून सुदैवाने जिवीतहाणी झालेली नाही़.रिधाेरा येथील ग्रॅन्ड जलसा या हाॅटेलमध्ये एका माेठया कुटुबातील विवाह साेहळा बुधवारी आयाेजीत करण्यात आला हाेता़. या विवाह साेहळयासाठी बाहेरगाववरुन आलेली आनंद ट्रूव्हल्सच्या खासगी बसला अचाणक आग लागली़. या आगीची माहीती मीळताच अग्नीशमन विभागाता तातडीने पाचारण करण्यात आले़. त्यांनीही विलंब न करता धाव घेउन बसला लागलेल्या आगीवर नियंत्रण मीळवीले़. यामध्ये बसचे माेठया प्रमाणात नुकसान झाले़; मात्र सुदैवाने जिवीतहाण झाली नाही़. यावेळी लग्ण साेहळयातीन मंडळी हाॅटेलच्या आतमध्ये असल्याने नुकसान झाले नाही़. या प्रकरणाची माहीती मीळताच पाेलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली हाेती़.