नाली दुरुस्तीअभावी बस बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:18 AM2021-02-10T04:18:07+5:302021-02-10T04:18:07+5:30
गतवर्षी जानेवारी महिन्यात खानापूर फाट्यापासून आगीखेड रोडपर्यंत मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेपासून डांबरीकरणाचे काम झाले आहे. सकाळी पातूर येथून ६.३० ...
गतवर्षी जानेवारी महिन्यात खानापूर फाट्यापासून आगीखेड रोडपर्यंत मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेपासून डांबरीकरणाचे काम झाले आहे. सकाळी पातूर येथून ६.३० वाजता अमरावती बस ही कित्येक वर्षांपासून सुरू आहे. ती महान, पिंजर, खेर्डा, कामरगाव मार्गे धावते. रोडचे व आवश्यक ठिकाणी पुलाचे कामकाज झाल्यामुळे हा रोड महान रोडला जोडल्या गेल्यामुळे सदर बस खानापूर मार्गे धावण्याची मागणी येथील नागरिकांची होती. एक दिवस बस आलीसुद्धा होती; परंतु टेकडीच्या पायथ्याशी बसलेल्या इंदिरा नगरात पाणी जाण्यासाठी दोन ठिकाणी खोल नाल्याचे काम केले आहे. त्यामुळे बसचा मागील भाग नालीच्या काठाला लागतो. त्यामुळे ही बस खानापूर मार्गे सुरू करण्यास अडचण झाली आहे. तरी संबंधित विभागाने नालीच्या ठिकाणी रपट्याची व्यवस्था करावी, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.