पातूर-बाळापूर मार्गे बस फेऱ्या दीड वर्षांपासून बंद !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:23 AM2021-08-21T04:23:23+5:302021-08-21T04:23:23+5:30
पातूरवासीयांसाठी बाळापूर उपविभागीय दर्जा असलेला महसुली गाव आहे. त्याबरोबरच तालुक्याचे ठिकाण असल्याने शैक्षणिक संस्था, शासकीय कार्यालयांमध्ये कर्मचारी दररोज ये-जा ...
पातूरवासीयांसाठी बाळापूर उपविभागीय दर्जा असलेला महसुली गाव आहे. त्याबरोबरच तालुक्याचे ठिकाण असल्याने शैक्षणिक संस्था, शासकीय कार्यालयांमध्ये कर्मचारी दररोज ये-जा करतात ; मात्र गेल्या दीड वर्षांपासून महामंडळाच्या बसफेऱ्या बंद असल्याने कर्मचाऱ्यांसह प्रवासी त्रस्त झाले आहेत. महामंडळाच्या बसफेऱ्या बंद असल्याने पातूर-बाळापूर महामार्गावर खासगी प्रवासी वाहतूक फोफावली आहे. पातूर-बाळापूर मार्गाने डॉ. वंदनाताई ढोणे आयुर्वेद महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मीनी एमआयडीसी, वीज वितरण कंपनीचे कार्यालय, देऊळगाव, बाभूळगाव, चान्नी फाटा, वाडेगाव आदी महत्त्वाचे बस थांबे आहेत ; मात्र या महामार्गावर बससेवा दीड वर्षापासून बंद असल्याने प्रवासी वैतागले आहेत.
-------------------
प्रवाशांची लूट सुरू !
पातूर-बाळापूर मार्ग महत्त्वाचा असल्याने या मार्गावर नेहमीच प्रवाशांची वर्दळ असते. प्रवाशांची संख्या पाहून या मार्गाने खासगी प्रवासी वाहतूक वाढली आहे. तसेच बसफेऱ्या बंद असल्याने प्रवाशांजवळून अव्वाच्या सव्वा भाडे वसूल करून लूट करीत असल्याचे चित्र आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देऊन बसफेऱ्या सुरू करण्याची मागणी होत आहे.
--------------------
पातूर-बाळापूर मार्गाने बसफेऱ्या बंद असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन पातूर-बाळापूर बस फेऱ्या सुरू कराव्या.
-प्रकाश गिरी, प्रवासी.