तेल्हारा : एसटीच्या संपामुळे बस वाहतूक ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 07:11 PM2017-10-17T19:11:20+5:302017-10-17T19:28:08+5:30
तेल्हारा : महाराष्ट्र एसटी कर्मचारी संयुक्त कृ ती समिती पदाधिकारी, मुख्यमंत्री, परिवहनचे प्रधान सचिव यांच्यातील वाटाघाटी फिस्कटल्याने १७ ऑक्टोबरपासून एसटी कर्मचार्यांचा निर्धारित संप सुरू झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
तेल्हारा : महाराष्ट्र एसटी कर्मचारी संयुक्त कृ ती समिती पदाधिकारी, मुख्यमंत्री, परिवहनचे प्रधान सचिव यांच्यातील वाटाघाटी फिस्कटल्याने १७ ऑक्टोबरपासून एसटी कर्मचार्यांचा निर्धारित संप सुरू झाला आहे. तेल्हारा आगारांतर्ग त महाराष्ट्र एसटी वर्कर्स कामगार संघटना इंटक व कामगार संघटना तेल्हारा शाखेचे पदाधिकारी व सदस्य, इंटकचे अध्यक्ष दिनकर पहुरकर, कामगार संघटनेचे अध्यक्ष नरेश मुराई, सचिव पी. एम. बोर्डे यांच्या नेतृत्वात संपात सहभागी झाले आहेत. सं पामुळे तालुक्यातील संपूर्ण बस वाहतूक ठप्प झाली असून, तेल्हारा आगाराला साडेतीन लाख रुपयांचा फटका बसला आहे.
म. रा. मार्ग परिवहन महामंडळ तेल्हारा आगार व्यवस्थापक, लिपिक असे तीन कर्मचारी वगळता आगारातील ८३ चालक, ८८ वाहक, ३0 मेकॅनिक, सहा वाहतूक नियंत्रक, आठ लि िपक, दोन पर्यवेक्षक असे २१७ कर्मचारी या संपात सहभागी झाले आहेत. तेल्हारा आगारांतर्गत दैनिक शेड्युल ३३ असून, १२ हजार कि.मी.चा प्रवास संपामुळे ठप्प झाला आहे. शिर्डी एक, यवतमाळ तीन, औरंगाबाद एक, नागपूर तीन अशा लांब पल्लय़ाच्या आठ फेर्या प्रभावित झाल्या आहेत. सेवाज्येष्ठतेनुसार पदनिहाय वेतनश्रेणी, सातवा वेतन आयोग द्यावा, यासह विविध मागण्यांसाठी राज्यभरातील एसटी कर्मचार्यांनी हा बेमुदत संप पुकारला आहे. ऐन दिवाळीसारख्या सणासुदीला संप सुरू करण्यात आल्याने सार्वजनिक वाहतूक सेवा ठप्प झाली आहे. प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. एसटी सेवाच बंद असल्याने प्रवाशांना अवैध प्रवासी वाहतुकीच्या वाहनांमधून नाइलाजाने प्रवास करावा लागत आहे. मेटॅडोर, काळी-पिवळी, ट्रॅक्स, ऑटोरिक्षा या वाहनातून धोकादायक प्रवास करावा लागत आहे. अवैध प्रवासी वाहतूकदार आपल्या वाहनात क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी कोंबून प्रवास करीत असल्याने प्रवाशांचे व ही वाहने भरधाव धावत असल्याने पादचार्यांच्या जीवित्वाला धोका उत् पन्न झाला आहे. प्रवाशांची गैरसोय होऊ नये, या मानवीय दृष्टिकोनातून पोलीस यंत्रणादेखील याकडे कानाडोळा करीत असल्याचे दिसून येत आहे.