अकोला जिल्ह्यातील रोहीत्रे आणि विद्युत खांब झाले वेलीमुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2020 01:08 PM2020-09-27T13:08:17+5:302020-09-27T13:09:07+5:30
६५८ विद्युत खांब व २३५ रोहित्रांवरील वेली काढल्या
अकोला : पावसाचे प्रमाण जास्त असल्याने दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी वीजखांबावर व रोहीत्रावर चढणाऱ्या वेलीचे प्रमाणही जास्त आहे. त्यामुळे अखंडित वीज पुरवठ्याला अडथळा ठरणाºया व प्रसंगी अपघातालाही निमंत्रण देणाºया वेली व झाडे-झुडूपे काढण्याची मोहिम हाती घेत जिल्ह्यात शनिवारी एकाच दिवशी ६५८ विद्युत खांब व २३५ रोहित्रांवरील वेली काढण्यात आल्या.
महावितरणची यंत्रणा उघड्यावरच आणि रानावनात पसरली असल्याने अनेक ठिकाणीरोहीत्रे आणि विद्युत खांब वेली तसेच झुडूपे यांच्या विळख्यात वारंवार अडकतात. यामुळे वीज यंत्रणा असुरक्षित होते. परिणामी थोडी हवा आली तरी खंडित वीज पुरवठ्याला सामोरे जावे लागते. शिवाय वेली व झुडूपे ही ओली असल्यामुळे यात व खांबाला लावलेल्या तानात वीज प्रवाह उतरण्याची शक्यता अधिक असते. हे अपघाताचे कारण बनू नये म्हणून जिल्हयात सुरक्षित वीज यंत्रणेतून वीज पुरवठा करण्यासाठी शनिवार, २६ सप्टेंबर रोजी एकाच दिवशी मोहीम घेऊन जिल्ह्यातील रोहीत्रे व विद्युत खांबावरील वेली व झाडे-झुडूपे काढण्यात आली.
अधिक्षक अभियंत पवनकुमार कछोट यांच्या मार्गदर्शनाखाली अकोला शहर ,अकोला ग्रामिण आणि अकोट विभागाचे कार्यकारी अभियंते यांच्या पुढाकाराने घेतलेल्या या मोहिमेत २३० कर्मचाऱ्यांचा सहभाग होता. वेलीमुक्त करण्यात आलेली वीजखांबे व रोहीत्रामध्ये अकोला शहर १८८ वीज खांबे व ९७ रोहीत्राचा समावेश आहे.यावेळी अकोला ग्रामीण विभागातील २६५ वीज खांबे व १०० रोहीत्रे वेलीमुक्त करण्यात आली.तर, हीच संख्या अकोट विभागासाठी अनुक्रमे २०५ व ३८ आहे.