लाॅकडाऊनमुळे बदलला व्यवसाय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 04:16 AM2021-03-24T04:16:52+5:302021-03-24T04:16:52+5:30
माझा फोटोग्राफीचा व्यवसाय होता, पण कोरोनाच्या महामारीने विवाह सोहळे बंद झाले. त्यामुळे व्यवसाय बंद पडला, परिवाराचा उदरनिर्वाह कसा ...
माझा फोटोग्राफीचा व्यवसाय होता, पण कोरोनाच्या महामारीने विवाह सोहळे बंद झाले. त्यामुळे व्यवसाय बंद पडला, परिवाराचा उदरनिर्वाह कसा करायचा हा प्रश्न पडला. मग मी जून २०२० पासून पोह्याची गाडी सुरू केली. सकाळी ९ ते २ वाजेपर्यंत मी पाेहे विकताे. आता पुन्हा बंधने आल्यामुळे मी पार्सल सुविधा सुरू केली.
नंदकिशाेर देवीदास काकडे
मी शाळेतील मुलांना ऑटाेमधून शाळेपर्यंत पाेहोचविण्याचे काम करत असे. लाॅकडाऊनमुळे शाळा बंद पडल्या. ऑनलाइन शिक्षण सुरू झाले, एसटीही बंदच हाेती. त्यामुळे प्रवासी वाहतूक ठप्प झाल्याने मी उदरनिर्वाहासाठी भाजीपाला विक्री सुरू केली. आता हाच व्यवसाय माझे उदरनिर्वाहाचे साधन आहे.
रामकृष्ण बाेदडे
लाॅकडाऊनमुळे बांधकामे बंद पडली हाेती. मी सेट्रिंगचे काम करत असे. आमचे घर मजुरीवर चालते. त्यामुळे पाेटासाठी नवा व्यवसाय निवडला. भाजीपाला विक्रीची गाडी सुरू केली, आता हाच व्यवसाय करणार.
गाेकुळा अनिल देशमुख
जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ मी नाश्ता विक्री करत असे. लाॅकडाऊनमुळे हाॅटेल बंद करण्यात आले. त्यामुळे उदरनिर्वाहासाठी फळ विक्रीचा व्यवसाय सुरू केला.