व्यवसाय बंद; हाताला काम नाही, आम्ही जगायचे तरी कसे ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:23 AM2021-09-15T04:23:23+5:302021-09-15T04:23:23+5:30
अकोला: कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून व्यवसाय बंद असून, हाताला कामही नसल्याने उपासमारीची वेळ आली असून, मातंग समाजाने जगायचे तरी ...
अकोला: कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून व्यवसाय बंद असून, हाताला कामही नसल्याने उपासमारीची वेळ आली असून, मातंग समाजाने जगायचे तरी कसे, असा सवाल करीत, उत्सवांच्या काळात वाद्य वाजविण्यास परवानगी देण्याच्या मागणीसाठी लहु सेना अकोला जिल्हा शाखेच्यावतीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे देण्यात आले.
कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन वर्षांपासून वाद्य वाजविण्याचा व्यवसाय बंद असून, हाताला कोणतेही काम नसल्याने, मातंग समाज बांधवांवर उपासमारीची वेळ आली आहे. हातात पैसा नसल्याने विविध प्रकारच्या आर्थिक समस्यांचा सामना करावा लागत असून, मुलाबाळांसह कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे गणपती, दुर्गादेवी उत्सव व इतर उत्सवांमध्ये बॅन्ड पथक, ढोलताशे, उफडे इत्यादी वाद्य वाजविण्यास लेखी परवानगी देण्यात यावी, तसेच मातंग समाजावरील अन्याय व अत्याचारासह मारहाणीचे प्रकार थांबविण्यात यावे आणि नांदेड जिल्हयातील गऊळ येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा शासनाच्यावतीने सन्मानाने बसविण्यात यावा आदी मागण्यांसंदर्भात एल्गार पुकारित लहु सेना अकोला जिल्हा शाखेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे देण्यात आले. मागण्याचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे सादर करण्यात आले. या धरणे आंदोलनात लहु सेनेचे संस्थापक उपाध्यक्ष गजानन दांडगे, जिल्हाध्यक्ष गजानन तायडे, बॅंड असोसिएशनचे जगदीश भोंगळ, सुनंदा चांदणे, नारायण मानवतकर, उमा अंभोरे यांच्यासह विठ्ठल मानकर, स्वप्निल तायडे, कैलास मानकर, गजानन गायकवाड, गोपाल वानखडे, वासुदेव गवई, महादेव नृपनारायण, राम खरात, श्याम खरात, रामा नृपनारायण, लक्ष्मण बांगर, श्रीकृष्ण बोदडे, विजय बांगर, संतोष वाडी, संदीप बांगर, सुरेश इंगळे, सचिन डोंगरे, राजू नावकार, अर्जुन क्षीरसागर, शिवा बोरकर, साहेबराव इंगळे, गजानन वाकोडे आदी लहू सेनेचे पदाधिकारी व बॅन्ड पथकांचे मालक व कलाकार सहभागी झाले होते.
ढोलताशांचा गजर करीत वेधले मागण्यांकडे लक्ष !
धरणे आंदोलनादरम्यान ढोल ताशांचा गजर करीत, मातंग समाजाला वाद्य वाजविण्यास लेखी परवानगी देण्यासह विविध मागण्यांकडे लहु सेनेच्यावतीने शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले.
...................फोटो..................