युवकांना उद्योग, व्यवसाय करण्याची संधी- कुलगुरू डॉ. भाले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2018 03:21 PM2018-10-28T15:21:57+5:302018-10-28T15:22:34+5:30
अकोला: विद्यार्थी, युवकांना उद्योग, व्यवसाय उभारण्यासाठी शासन अनुकूल असून, स्टार्टअप इंडिया यात्रेच्या माध्यमातून ही संधी उपलब्ध करू न देण्यात आली असल्याचे प्रतिपादन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही.एम. भाले यांनी केले.
अकोला: विद्यार्थी, युवकांना उद्योग, व्यवसाय उभारण्यासाठी शासन अनुकूल असून, स्टार्टअप इंडिया यात्रेच्या माध्यमातून ही संधी उपलब्ध करू न देण्यात आली असल्याचे प्रतिपादन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही.एम. भाले यांनी केले.
औद्योगिक धोरण व प्रोत्साहन विभाग, स्टार्टअप इंडिया आणि महाराष्ट्र सरकार, कौशल्य विकास आणि उद्योजकता विभाग, महाराष्ट्र राज्य इनोव्हेशन सोसायटी (एमएसएनएस) एकत्रितपणे ३ आॅक्टोबर ते ३ नोव्हेंबरपर्यंत स्टार्टअप इंडिया यात्रेला सुरुवात केली आहे. या उपक्रमांतर्गत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्यवतीने डॉ. के.आर. ठाकरे सभागृहात प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. प्रशिक्षणाच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. भाले बोलत होते. याप्रसंगी उद्योजक गणेश देशमुख, स्टार्टअपचे राष्ट्रीय फेलो श्रीवास्तव, मुख्यमंत्री प्रतिनिधी उमेश बलवाणी (मुंबई), कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. व्ही.के. खर्चे,विस्तार शिक्षण संचालक डॉ.डी.एम. मानकर, कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एम.बी. नागदेवे, डॉ.एस.आर. काळबांडे, युवा उद्योजक आश्विन पावडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. भाले यांनी भारत युवकांचा देश असून, उद्योग, व्यवसाय क्षेत्रात त्यांना दिशा देण्याचे काम वर्तमान सरकारकडून केले जात आहे. या बळावरच देश महासत्ता होईल, असा विश्वास व्यक्त केला. स्टार्टअप अंतर्गत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाला एक केंद्र मिळाल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
यावेळी उद्योजकांनी व्यवसायात, उद्योग उभारताना अडचणी कमी झाल्यानंतर युवकांना उद्योगात उतरता येईल. त्याकरिता उद्योग टाकताना ज्या काही अडचणी येतात, त्या सुलभ होणे गरजेचे आहे. यानंतर श्रीवास्तव यांनी युवकांना याबाबत प्रशिक्षण दिले. अकोला जिल्ह्यातून २५० युवकांची यासाठी निवड करण्यात आली असून, या युवकांनी त्यांच्याकडील उद्योगासाठी लागणारे व विकसित केलेले तंत्रज्ञान, कला सादर करायच्या आहेत. यातून जे तंत्रज्ञान प्रभावी व उपयोगी ठरतील त्याची निवड करण्यात येणार आहे. संचालन संशोधन अभियंता डॉ. प्रदीप बोरकर यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. काळबांडे यांनी केले.