बेरोजगार ऑटोचालकांनी सुरु केला भाजी विक्रीचा व्यवसाय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2020 06:28 PM2020-04-14T18:28:45+5:302020-04-14T18:28:50+5:30
कोल्यातील काही आॅटो चालकांनी आॅटोरिक्षातच भाजीपाला विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे .
अकोला : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आला असून, सगळीकडे संचारबंदी आहे. याचा परिणाम सर्वच व्यवसायांवर झाला आहे. सर्व प्रकारची वाहतूक बंद असल्याने आॅटो चालकाला याचा मोठा फटका बसला आहे .अकोला जिल्ह्यातील सर्व आॅटो रिक्षा बंद असल्याने आॅटो चालकांसमोर उदरनिवार्हाचा प्रश्न निर्माण झाला आहे . रोजगार असल्याने अकोल्यातील काही आॅटो चालकांनी आॅटोरिक्षातच भाजीपाला विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे .
अकोला जिल्ह्यात जवळपास २० हजार आॅटोरिक्षा आहेत. लॉकडाऊनमुळे आॅटोरिक्षा चालकांसमोर उदरनिवार्हाचा प्रश्न निर्माण झाला आहे. दोन वेळच्या जेवनाची सोय लागावी म्हणून काही आॅटो चालकांनी आॅटो रिक्षात भाजीपाला दुकान थाटले आहे. सकाळी बाजारातून भाजीपाला विकत आणून गावोगावी जाऊन भाजीपाला विक्रीचे काम हे आॅटोचालक करीत आहेत. १४ एप्रिलला लॉकडाऊन संपणार या आशेवर असलेल्या अनेकांचा हिरमोड झाला आहे. आता ३ मे पर्यंत लॉकडाऊन राहणार असल्याने आॅटोचालक धास्तावले आहेत. शासनाने आमचा विचार करावा, अशी मागणी आॅटोचालकांकडून होत आहे.