व्यापाऱ्यांच्या अघोषित बंदमुळे बुलडाणा जिल्ह्यातील १३ बाजार समित्यांमधील उलाढाल ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 02:31 PM2018-08-29T14:31:33+5:302018-08-29T14:35:11+5:30
बुलडाणा : व्यापाºयांनी हमी भावात माल खरेदी न केल्यास शिक्षा व दंडाची तरतूद केली आहे. या पृष्ठभूमिवर व्यापाºयांनी अघोषित बंद पुकारल्यामुळे बाजार समितीतील उलाढाल ठप्प झाली आहे.
बुलडाणा : व्यापाºयांनी हमी भावात माल खरेदी न केल्यास शिक्षा व दंडाची तरतूद केली आहे. या पृष्ठभूमिवर व्यापाºयांनी अघोषित बंद पुकारल्यामुळे बाजार समितीतील उलाढाल ठप्प झाली आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत आला असून शासनाने हमी भाव कायद्याास स्थगिती द्यावी, अशी मागणी होत आहे.
बुलडाणा जिल्ह्यातील १३ बाजार समित्यामध्ये हमी भावात शेतकºयांना माल खरेदी करणे परवडत नसल्याने तसेच हमीभावापेक्षा कमी दरात खरेदी केल्यास एक वर्षाची शिक्षा ५० हजार रूपये दंडाची तरतूद शासनाने केल्यामुळे गुन्हे दाखल होण्याच्या भितीपोटीबाजार समितीमधील व्यापाºयांनी अघोषित संप पुकारला आहे. याबाबत व्यापारी संघटनांनी हमी भावात खरेदीदार नसल्यामुळे बाजार समिती बंद असल्याचे प्रशासनाला कळविले आहे. त्यामुळे आज रोजी जिल्हयातील तेराही बाजार समित्यांमध्ये खरेदी थांबली असून कोणताही शेतकरी माल बाजार समितीत विकण्यासाठी आणताना दिसून येत नसून यापूर्वी यार्डात ठेवण्यात आलेला शेतमाल जैसे थे आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत आला असून आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.
जिल्ह्यातील खामगाव ही बुलडाणा जिल्हयातील मोठी बाजार समितीअसूनही गुरुवार पासून व्यापाºयांनी कोणत्याही शेतमालाची खरेदी केली नाही. चिखली बाजार समितीतीतही शुकशुकाट असून २४ ते २८ आॅगस्ट या काळात हरभरा १९ पोते, मूग ६ पोते, तूर ५६ पोत, सोयाबीन ६९ पोते, गहु ११ असे १६१ पोते माल यार्डात उतरवला आहे. तर बाजार समिती बंदमुळे अनेक शेतकरी माल परत घेवून जात आहेत. सध्या शेतकºयांच्या घरात मुंगाचे पीक यायला सुरुवात झाली आहे. नवीन मुगासह आता शेतमाल होऊन बाजारात येण्याची स्थिती आहे. सोयाबीन व मकाही शेतकरी आता विक्रीला आणत आहे. या मालाच्या विक्रीतून शेतकरी कर्ज फेडण्याची तयार करीत असतो. मात्र शासनाने शेतकºयांना शेलमालाचा हमी भाव न दिल्यास कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्याची तरतूद केल्यामुळे बाजार समितीमधील व्यापाºयांनी खरेदी बंद केल्यामुळे जिल्हयातील शेतकरी अडचणीत सापडले आहेत.