८५0 क्विंटल कापूस खरेदी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2017 12:46 AM2017-11-01T00:46:43+5:302017-11-01T00:47:50+5:30
अकोला : राज्यात यंदा वीस दिवस आधीच शासकीय कापूस खरेदीला सुरुवात करण्यात आली असून, महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाने आतापर्यंत ८५0 िक्ंवटल कापसाची खरेदी केली आहे. मात्र येथे ओलावा व प्र तवारीचे निकष कडक करण्यात आल्याने व्यापार्यांनाच कापूस विकण्याची पाळी शेतकर्यांवर आली आहे.
राजरत्न सिरसाट ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : राज्यात यंदा वीस दिवस आधीच शासकीय कापूस खरेदीला सुरुवात करण्यात आली असून, महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाने आतापर्यंत ८५0 िक्ंवटल कापसाची खरेदी केली आहे. मात्र येथे ओलावा व प्र तवारीचे निकष कडक करण्यात आल्याने व्यापार्यांनाच कापूस विकण्याची पाळी शेतकर्यांवर आली आहे. दरम्यान, खासगी बाजारात जिल्हानिहाय कापसाचे दर बदलत असून, अनेक ठिकाणी चार हजार रुपये प्रतिक्विंटलने कापसाची खरेदी केली जात असल्याचे वृत्त आहे.
राज्यात दरवर्षी १५ नोव्हेंबरनंतर शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू केली जातात. यावर्षी वीस दिवस आधीच ५९ केंद्रांवर खरेदी सुरू करण्यात आली आहे. मात्र आठ टक्केच ओलावा व सर्वसाधारण प्रतीच्या (एफएक्यूू) कापसाचे निकष लावण्यात आल्याने शेतकर्यांना व्यापार्यांनाच कापूस विकावा लागत आहे. केंद्र शासनाने यावर्षी ४,३२0 रुपये कापसाचे हमीदर जाहीर केले आहेत; पण निकषाच्या शर्यतीत कापूस उत्पादक मागे पडल्याचे चित्र आहे.राज्यात खासगी बाजारात ठिकठिकाणी वेगवेगळे दर आहेत. जळगाव खान्देश भागात ४,000 ते ४,७00 रुपये क्विंटल, तर विदर्भात हेच दर चार हजार रुपये आहेत. दरम्यान, रब्बी हंगामातील पिकांच्या पेरणीसाठी शे तकर्यांना पैशांची नितांत गरज आहे. त्यामुळे त्यांना मिळेल्या त्या किमतीला कापूस विकण्यावाचून पर्याय राहिलेला नाही. त्यातच सोयाबीनलाही प्रतवारीचे निकष लावले जात असल्याने सोयाबीनही अल्पदरात विकण्याची पाळी शेतकर्यांवर आली आहे.
सध्या कापसात ओलावा आहे. नियमित कापसाची आवक १५ नोव्हेंबरनंतरच होते, तेव्हा कापसाला चांगले दर मिळतील.
- जे. पी. महाजन, विभागीय अधिकारी