हरभरा बियाणे खरेदीकडे पाठ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 12:52 AM2017-10-25T00:52:19+5:302017-10-25T00:52:53+5:30

अकोला : विदर्भातील शेतकर्‍यांनी रब्बी हंगामासाठीच्या पेरणीची तयारी केली; पण जमिनीत ओलावाच नसल्याने हरभरा बियाणे खरेदीकडे पाठ फिरवली. त्यामुळे एन रब्बी हंगामाच्या काळात बियाणे बाजारात शुकशुकाट पसरला आहे.

Buy the seeds of gram seeds! | हरभरा बियाणे खरेदीकडे पाठ!

हरभरा बियाणे खरेदीकडे पाठ!

Next
ठळक मुद्देजमिनीत ओलावा नसल्याने शेतकरी हतबलअनुदानित बियाण्यांचे दरही चढे

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : विदर्भातील शेतकर्‍यांनी रब्बी हंगामासाठीच्या पेरणीची तयारी केली; पण जमिनीत ओलावाच नसल्याने हरभरा बियाणे खरेदीकडे पाठ फिरवली. त्यामुळे एन रब्बी हंगामाच्या काळात बियाणे बाजारात शुकशुकाट पसरला आहे. अनुदानित बियाण्यांचे दरही खासगी कंपन्यांच्या बियाणे दरापेक्षा प्रतिकिलो १५ ते २0 रुपये जास्त आहेत. एक-दोन दिवसांत परतीचा पाऊस आला नाही, तर मात्र रब्बी हंगामातील पेरा घटण्याची शक्यता आहे.
गतवर्षी पश्‍चिम विदर्भात अतवृष्टी झाली. परतीच्या पावसानेही चांगलाच मुक्काम ठोकल्याने त्याचा फायदा रब्बी हंगामाला झाला होता. त्यामुळे पश्‍चिम विदर्भात गतवर्षी साडेआठ लाखांपेक्षा अधिक हेक्टरवर रब्बीची पेरणी शेतकर्‍यांनी केली होती. पावसाचा ओलावा अधिक असल्याने रब्बी पिके चांगली होती. यावर्षी पूरक पाऊस झाला नसल्याने शेतात ओलावा नाही. त्याचा परिणाम रब्बी क्षेत्रावर होताना दिसत आहे. त्यामुळे शेकडो शेतकर्‍यांनी धाडस करू न घरचे बियाणे वापरले. उगवण नाही झाली, तर किमान हातचा पैसा तर जाणार नाही, या उद्देशाने शेतकर्‍यांनी घरचे बियाणे पेरणीसाठी वापरले. 
दरम्यान, यावर्षी सोयाबीनची पेरणी जुलैपर्यंत झाल्याने बहुतांश भागात सोयाबीन हिरवेच आहे. रब्बी हरभर्‍याची पेरणीची मुदत ही १५ ऑक्टोबरपर्यंत असते. शेतकरी ३0 ऑक्टोबरपर्यंत पेरणी करतात; पण यावर्षीची परिस्थिती प्रतिकूल असल्याने एकूण सर्वच परिस्थितीचा परिणाम बियाणे बाजारावर झाला. बाजारात यावर्षी अुनदानित बियाणे ६५ रुपये कि लो, तर खासगी कंपन्यांचे हरभरा बियाणे ४५ ते ४८ रुपये प्रतिकलो आहेत. त्याचेही पडसाद बियाणे बाजारावर झाले.

यावर्षी जमिनीत ओलावा नसल्याने रब्बी हंगामातील हरभरा बियाणे खरेदीचा उठाव नाही. शेतकर्‍यांनी धाडस करू न घरचे बियाणे पेरणीसाठी वापरले, तसेच खासगी कंपन्यांपेक्षा अनुदानी बियाण्यांचे दर १५ रुपये अधिक आहेत. 
- मोहन सानोने,
कृषी माल अभ्यासक, अकोला.

Web Title: Buy the seeds of gram seeds!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती