अनुदानावरील सोयाबीन बियाण्यांचीच खरेदी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 01:52 PM2018-06-12T13:52:59+5:302018-06-12T13:52:59+5:30

अकोला : महाराष्टÑ राज्य बियाणे महामंडळाचे (महाबीज) सोयाबीनचे बियाणे अनुदानावर उपलब्ध असून, शेतकऱ्यांनी या बियाणे खरेदीला सुरुवात केली आहे. परमिटवर हे बियाणे उपलब्ध आहे; पण ही खरेदीदेखील यावर्षी संथ गतीने असल्याचे बियाणे बाजारातील चित्र आहे.

Buy soybean seeds on subsidy! | अनुदानावरील सोयाबीन बियाण्यांचीच खरेदी!

अनुदानावरील सोयाबीन बियाण्यांचीच खरेदी!

Next
ठळक मुद्देराज्याच्या कृषी विभागाने २ लाख १४ हजार क्ंिवटल बियाणे अनुदानावर उपलब्ध केले आहे. अकोला जिल्ह्यातील बियाणे बाजाराचा आढावा घेतला असता, या जिल्ह्यात ४५० कृषी निविष्ठा सेवा केंद्र आहेत.राज्यात आतापर्यंत सर्वच वाणांचे ८० टक्के बियाणे बाजारात पोहोचले.

अकोला : महाराष्टÑ राज्य बियाणे महामंडळाचे (महाबीज) सोयाबीनचे बियाणे अनुदानावर उपलब्ध असून, शेतकऱ्यांनी या बियाणे खरेदीला सुरुवात केली आहे. परमिटवर हे बियाणे उपलब्ध आहे; पण ही खरेदीदेखील यावर्षी संथ गतीने असल्याचे बियाणे बाजारातील चित्र आहे.
महाबीजने यावर्षी राज्यात ४ लाख ३० हजार क्ंिवटल सोयाबीन बियाणे बाजारात उपलब्ध केले आहे. २० हजार क्ंिवटल अतिरिक्त बियाणे खरेदीची निविदा काढली आहे. यावर्षी सोयाबीनचे क्षेत्र वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने राज्याच्या कृषी विभागाने २ लाख १४ हजार क्ंिवटल बियाणे अनुदानावर उपलब्ध केले आहे. अनुदानावरील बियाणे परमिटवर उपलब्ध आहे. त्यासाठी शेतकºयांना सातबारा व संबंधित कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. पण, अनुदानावरील बियाणे खरेदीही संथ गतीने होत आहे. अकोला जिल्ह्यातील बियाणे बाजाराचा आढावा घेतला असता, या जिल्ह्यात ४५० कृषी निविष्ठा सेवा केंद्र आहेत. त्यापैकी ३०० कृषी निविष्ठी विक्री केंद्र सुरू असून, या ३०० यातील एका मोठ्या विक्री केंद्रावर अनुदानावरील केवळ ३४४ सोयाबीन बियाणे गोण्यांची विक्री झाली, तर जिल्ह्यातील उर्वरित केंद्रावर १,५०० च्या जवळपास बियाणे गोण्यांची विक्री झाल्याचे बियाणे विक्रेत्यांनी सांगितले. घाऊक बियाणे विक्री जवळपास ४० टक्के झाली असून, विक्रेते हे बियाणे किरकोळ स्वरू पात शेतकºयांना विकतात. इतर बियाण्यांची आतापर्यंत जवळपास २० टक्ेकही विक्री झाल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.
राज्यात आतापर्यंत सर्वच वाणांचे ८० टक्के बियाणे बाजारात पोहोचले असून, २० टक्के बियाणे येत्या आठवड्यात पोहोचणार असल्याचे कृषी विभागाच्यावतीने सांगण्यात आले आहे.


- बियाणे विक्री सुरू झाली आहे. परमिटवरील बियाणे शेतकरी घेताहेत, पाऊस आल्यावर आणखी गती येईल.
रामचंद्र नाके,महाव्यवस्थापक (विपणन), महाबीज, अकोला.

 

Web Title: Buy soybean seeds on subsidy!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.