तूर खरेदी ; शेतकरी पेचात!
By admin | Published: April 22, 2017 01:22 AM2017-04-22T01:22:53+5:302017-04-22T01:22:53+5:30
आजपासून खरेदी होणार बंद : मोजमापाविना तूर घरी नेण्याची आली वेळ
अकोला : हमीदराने ह्यनाफेडह्णच्या तूर खरेदी केंद्रांवर गत दीड महिन्यांपासून मोजमापाच्या प्रतीक्षेत तुरीचे ट्रॅक्टर उभे असताना,ह्यनाफेडह्णद्वारे तूर खरेदीची मुदतवाढ शनिवारी सायंकाळी संपत असल्याने, तुरीचे ट्रॅक्टर मोजमापाविनाच घरी नेण्याची वेळ तूर उत्पादक शेतकर्यांवर आली आहे. त्यामुळे नाफेडद्वारे तूर खरेदीचा सुरू असलेला खेळखंडोबा बघता, तूर कोठे विकणार, या पेचात तूर उत्पादक शेतकरी सापडला आहे.
शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत प्रतिक्विंटल ५ हजार ५0 रुपये हमीदराने नाफेडमार्फत तूर खरेदी करण्यात येत आहे. जिल्हय़ात अकोला, बाळापूर व पातूर या तीन तालुक्यांसाठी अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती या एका खरेदी केंद्रावर तूर खरेदी करण्यात येत असून, अकोट, मूर्तिजापूर, बाश्रीटाकळी व तेल्हारा या चार ठिकाणी खरेदी केंद्रांवर तूर खरेदी करण्यात येत आहे. खरेदी केंद्रांवर तुरीची आवक मोठय़ा प्रमाणात होत असून, त्या तुलनेत तूर खरेदीची प्रक्रिया संथगतीने सुरू आहे. बारदान्याचा अभाव आणि कर्मचार्यांची तोकडी संख्या असल्याने, दीड महिना उलटून जात असला, तरी शेतकर्यांना तुरीच्या मोजमापासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. तुरीच्या मोजमापासाठी गत दीड महिन्यांपासून शेतकरी प्रतीक्षेत असतानाच, १५ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजतापासून ह्यनाफेडह्णद्वारे तूर खरेदी बंद करण्यात येणार होती. दरम्यान, तूर खरेदीला नाफेडद्वारे २२ एप्रिलपर्यंत आठ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली. त्यानुसार नाफेडद्वारे तूर खरेदीची मुदतवाढ शनिवार, २२ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता संपत असल्याने, शनिवारी सायंकाळपासून नाफेडद्वारे तूर खरेदी बंद होणार आहे. त्यामुळे खरेदी केंद्रांवर गत दीड महिन्यांपासून मोजमापाच्या प्रतीक्षेत असलेले तुरीचे ट्रॅक्टर मोजमापाविनाच घरी नेण्याची वेळ तूर उत्पादक शेतकर्यांवर आली आहे. नाफेडद्वारे बंद करण्यात येत असलेली तूर खरेदी आणि बाजारात तुरीला मिळणारा कमी भाव बघता, तूर कोठे विकणार, याबाबतची चिंता शेतकर्यांना सतावत आहे.
कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता
नाफेडद्वारे तूर खरेदीची २२ एप्रिल रोजी संपत आहे; मात्र खरेदी केंद्रांवर तुरीची आवक मोठय़ा प्रमाणात होत आहे, तसेच गत एक ते दीड महिन्यांपासून खरेदी केंद्रांवर अनेक शेतकरी तुरीच्या मोजमापाची प्रतीक्षा करीत आहेत. अशा परिस्थितीत तूर खरेदी बंद झाल्यानंतर शेतकर्यांमध्ये असंतोष निर्माण होण्याची शक्यता असून, त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात उपाययोजना करण्याच्या सूचना राज्याच्या पणन संचालकांनी अकोला जिल्हय़ासह इतर जिल्हय़ांच्या जिल्हाधिकार्यांना २१ एप्रिल रोजी पत्राद्वारे दिल्या आहेत.
५९0 ट्रॅक्टर प्रतीक्षेत!
२२ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजतापासून नाफेडद्वारे तूर खरेदी बंद करण्यात येणार आहे; मात्र अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुरीचे ५९0 ट्रॅक्टर मोजमापाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामध्ये गत २६ फेब्रुवारीपासून ३५0 ट्रॅक्टरमधील मोजमाप रखडले असून, १५ मार्चनंतर २00 ट्रॅक्टरमधील तुरीचे मोजमाप बाकी आहे.
नाफेडद्वारे तूर खरेदी २२ एप्रिल रोजी सायंकाळपासून बंद करण्यात येणार आहे; मात्र कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोजमापाच्या प्रतीक्षेत असलेल्या ट्रॅक्टरमधील तुरीचे मोजमाप करण्याची व्यवस्था करण्यात आली पाहिजे. नाफेडद्वारे तूर खरेदीला मुदतवाढ देण्याची गरज आहे, यासंदर्भात पणन संचालकांसह जिल्हाधिकारी, जिल्हा मार्केटिंग अधिकार्यांकडे पत्राद्वारे मागणी केली आहे.
-शिरीष धोत्रे,
सभापती, अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती.