बटवाडी पंचायत समिती सदस्य रिक्त पदाची पोटनिवडणूक!
By रवी दामोदर | Updated: July 22, 2024 17:17 IST2024-07-22T17:16:52+5:302024-07-22T17:17:04+5:30
निवडणूक क्षेत्रात आचारसंहिता : २९ जूलैपर्यंत स्विकारण्यात येणार नामनिर्देशन

बटवाडी पंचायत समिती सदस्य रिक्त पदाची पोटनिवडणूक!
अकोला: बाळापूर पंचायत समितीमधील ७७ - बटवाडी बु.येथील रिक्त सदस्य पदासाठी दि.२३ पासून दि. २९ जुलैपर्यंत सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत बाळापूर उपविभागीय अधिकारी कार्यालयात नामनिर्देशन पत्रे स्वीकारण्यात येत आहेत. दरम्यान, आवश्यक असल्यास रविवार, दि.११ ऑगस्ट रोजी पोटनिवडणूक पार पडणार आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून बाळापूर उपविभागीय अधिकारी व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून बाळापूर तहसीलदारांची नेमणूक करण्यात आली आहे. यासंदर्भात जिल्हा निवडणूक अधिकारी अजित कुंभार यांनी आदेश निर्गमित केला. निर्वाचक गणाच्या क्षेत्रात आचारसंहिता अंमलात आली असून, ती भंग होणार नाही याची दक्षता घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
प्राप्त नामनिर्देशन पत्राची छाननी दि.३० जुलै रोजी सकाळी ११ वाजता करण्यात येणार आहे. आवश्यक असल्यास रविवार, दि. ११ ऑगस्ट रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळ ५.३० या वेळेत मतदान होणार आहे. मतमोजणी बाळापूर तहसील कार्यालय येथे सोमवार, दि. १२ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता करण्यात येणार आहे.