सीए आयपीसी परीक्षेत आदित्य देशात अठरावा
By Admin | Published: July 31, 2015 11:14 PM2015-07-31T23:14:58+5:302015-07-31T23:14:58+5:30
आदित्य बगडिया देशातून १८ वा, तर अकोल्यातून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण.
अकोला : इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटस ऑफ इंडियातर्फे घेण्यात येणार्या सीए आयपीसी (इंटरमीजेट) परीक्षेचा शुक्रवारी दुपारच्या दरम्यान निकाला जाहिर झाला असून, आदित्य बगडिया देशातून १८ वा, तर अकोल्यातून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडियातर्फे मे महिन्यात घेण्यात आलेल्या सीए आयपीसी परीक्षेचा निकाल शुक्रवार, ३१ जुलै रोजी दुपारच्या दरम्यान संकेतस्थळावर जाहीर झाला. परीक्षेत आदित्य मनोज बगडिया याला ५२८ गुण मिळाले असून, तो देशातून १८ व्या क्रमांकाने, तर अकोल्यातून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे. सीए अंतिम परीक्षेपूर्वी ही परीक्षा घेण्यात येत असून यासाठी जिलतील ४२५ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. परीक्षेच्या पहिल्या गटासाठी ११२ विद्यार्थी बसले असून, त्यापैकी केवळ ५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले, तर दुसर्या गटामध्ये १२२ पैकी १९ विद्यार्थी पास झाले. दोन्ही गटांसाठी १९१ विद्यार्थी बसले होते. यामध्ये दोन्ही गटात ३0 विद्यार्थी आणि केवळ पहिल्या गटात ३३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. असे एकूण ८७ विद्यार्थ्यांनी सीए आयपीसी परीक्षेत यश संपादन केले. यामध्ये जिलतील क्षितिज गोयनका, प्रणव अग्रवाल, पलक कालाणी, वैशाली वाणी, सुमीत मेहरा, आरूषी खंडेलवाल, निशा भूतडा, अजय भंडारी, प्रियंका गांधी आदी विद्यार्थ्यांचा समावेश आहे.