तूर खरेदीत असहकार पुकारल्यास ग्रेडरविरुद्ध गुन्हे दाखल करा!
By ram.deshpande | Published: July 26, 2017 02:40 AM2017-07-26T02:40:52+5:302017-07-26T02:41:05+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: तूर खरेदीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या खरेदी केंद्रांवर ग्रेडरने रुजू व्हावे, अन्यथा तूर खरेदीच्या कामात असहकार्य करणाºया ग्रेडरविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचा आदेश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी मंगळवारी अकोला, अकोट व तेल्हारा उपविभागीय अधिकारी (एसडीओ) आणि तहसीलदारांना दिला.
टोकन देण्यात आलेल्या जिल्ह्यातील १४ हजार ५२४ शेतकºयांची तूर खरेदीची प्रक्रिया मंगळवार, २५ जुलैपासून जिल्ह्यातील अकोला, अकोट, तेल्हारा, बार्शीटाकळी व मूर्तिजापूर या पाचही खरेदी केंद्रांवर सुरू करण्याचा आदेश जिल्हाधिकाºयांनी २४ जुलै रोजी दिला होता; परंतु २५ जुलै रोजी खरेदी केंद्रांवर ग्रेडर रुजू झाले झाले नाही.
तसेच तूर खरेदी प्रक्रियेत तूर उत्पादक शेतकºयांच्या कागदपत्रांची तपासणी करण्याचे काम करण्यास तहसीलदार -नायब तहसीलदार संघटनेच्यावतीने नकार देण्यात आला. त्यामुळे जिल्ह्यात २५ जुलैपासून तूर खरेदी सुरू होऊ शकली नाही. या पृष्ठभूमीवर २६ जुलैपासून खरेदी केंद्रांवर संबंधित ग्रेडरनी रुजू व्हावे, अन्यथा तूर खरेदीच्या कामात असहकार्य करणाºया आणि शासकीय कामात अडथळा आणणाºया ग्रेडरविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचा आदेश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी अकोला, अकोट व तेल्हारा येथील संबंधित उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांना दिला.
आजपासून होणार खरेदी !
शेतकºयांच्या कागदपत्रांची तपासणी करण्याचे काम नायब तहसीलदारांकडे देण्यात आले; मात्र त्या कामावर तहसीलदार -नायब तहसीलदार संघटनेच्यावतीने बहिष्कार टाकण्यात आला. तसेच ग्रेडर खरेदी केंद्रांवर रुजू झाले नाही. त्यामुळे जिल्ह्यातील पाचही खरेदी केंद्रांवर २५ जुलैपासून खरेदी सुरू झाली नाही. २६ जुलै रोजी सकाळी ८ वाजतापासून खरेदी सुरू होणार आहे.
तपासणीचे काम कृषी व सहकार विभागाकडे!
त्यामुळे तूर खरेदीसाठी शेतकºयांच्या कागदपत्रांची तपासणी करण्याचे काम कृषी विभाग व सहकार विभागांतर्गत जिल्हा उपनिबंधक कार्यालय अंतर्गत अधिकारी -कर्मचाºयांकडे देण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी मंगळवारी दिला.
प्रहार संघटना आक्रमक; बाजार समितीमध्ये ठिय्या!
२५ जुलै रोजी तूर खरेदी सुरू न झाल्याच्या मुद्द्यावर प्रहार संघटनेच्या पदाधिकाºयांनी मंगळवारी आक्रमक भूमिका घेत अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात ठिय्या दिला. बाजार समिती सचिवांसोबत चर्चेनंतर घोषणा देण्यात आल्या. आंदोलनकर्त्या प्रहार संघटनेच्या पदाधिकाºयांनी जिल्हा परिषदेत अमरावती विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांची भेट घेऊन तूर खरेदीच्या मुद्द्यावर चर्चा केली. आंदोलनात प्रहार संघटनेचे नीलेश ठोकळ, श्याम राऊत, संदीप पाटील, सोपान कुटाळे, सुहास साबे, कुणाल जाधव, अतुल काळणे व पदाधिकारी सहभागी होते.
खरेदी केंद्रांवर ग्रेडरनी रुजू व्हावे, अन्यथा कामात अडथळा आणणाºया ग्रेडरविरोधात गुन्हे दाखल करण्याचा आदेश एसडीओ-तहसीलदारांना देण्यात आला आहे. तसेच शेतकºयांच्या कागदपत्रांची तपासणी करण्याचे काम कृषी विभाग व सहकार विभागांतर्गत अधिकारी-कर्मचाºयांकडे देण्यात आले असून, २६ जुलपासून जिल्ह्यात तूर खरेदी सुरू करण्यात येणार आहे.
- आस्तिककुमार पाण्डेय, जिल्हाधिकारी