वीज ग्राहकांच्या तक्रार निवारणासाठी जिल्हाभरात मेळावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2019 05:34 PM2019-07-24T17:34:53+5:302019-07-24T17:35:01+5:30
महावितरण अकोला ग्रामीण विभागाच्या वतीने २५ जुलैपासून तीन दिवस अकोला ग्रामीण, मुर्तीजापूर, बाळापूर, बार्शीटाकळी आणि पातूर येथे उपविभागनिहाय ग्राहक सुसंवाद व तक्रार मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे.
अकोला : महावितरणअकोला शहर विभागानंतर आता ग्रामीण विभागातील वीज ग्राहकांच्या तक्रारांची दखल घेण्यासाठी महावितरण अकोला ग्रामीण विभागाच्या वतीने २५ जुलैपासून तीन दिवस अकोला ग्रामीण, मुर्तीजापूर, बाळापूर, बार्शीटाकळी आणि पातूर येथे उपविभागनिहाय ग्राहक सुसंवाद व तक्रार मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे.
अकोला परिमंडळाचे मुख्य अभियंता अनिल डोये यांच्या निर्देशानुसार अकोला परिमंडळातील अकोला , बुलढाणा व वाशिम जिल्हयात महावितरण ग्राहकांच्या वीज सेवेबाबत असलेल्या विविध तक्रारीचे निवारण करण्यासाठी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
अकोला ग्रामीण विभागातील अकोला ग्रामीण व बाळापुर उपविभागात दिनांक २५ जुलै रोजी, मुर्तीजापूर व बार्शिटाकळी उपविभागात २६ जुलै रोजी, तर पातूर उपविभागात २७ जुलै रोजी सकाळी १० ते दुपारी १:३० या कालावधीत संबधित उपविभागाच्या कार्यालयीन परिसरातच हे मेळावे पार पडणार आहेत. या मेळाव्यात विविध वर्गवारीतील ग्राहकांची वीज बिल दुरूस्ती , नविन वीज जोडणी , वाढीव भार , नावामधिल बदल दुरूस्ती , मोबाईल क्रमांक नोंदणी इत्यादी तक्रारींची दखल घेण्यात येणार आहे. शिवाय महावितरण वॉलेट पेमेंट व इतर सुविधाबाबतही यावेळी ग्राहकांना माहिती देण्यात येणार आहे. त्यामुळे अकोला ग्रामीण भागातील अकोला ग्रामीण ,बाळापूर , मुतीर्जापूर ,बाशीर्टाकळी , आणि पातूर या उपविभागातील महावितरणच्या ग्राहकांनी त्यांच्या तक्रारी संदभार्तील कागदपत्रे व वीज देयके सोबत आणावे असेही आवाहन महावितरण अकोला ग्रामीण विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.