घरचे साधे पाणी परवडले, पण कोरोनाकाळात कॅनचे पाणी नको!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:17 AM2021-05-01T04:17:34+5:302021-05-01T04:17:34+5:30
शहरात जार निर्मितीचे प्रकल्प-३०६ मार्च २०१९ मध्ये दररोज होणारी विक्री- २०० कॅन मार्च २०२० मध्ये दररोज होणारी विक्री- ५०-७० ...
शहरात जार निर्मितीचे प्रकल्प-३०६
मार्च २०१९ मध्ये दररोज होणारी विक्री- २०० कॅन
मार्च २०२० मध्ये दररोज होणारी विक्री- ५०-७० कॅन
मार्च २०२१ मध्ये दररोज होणारी विक्री- २०-४० कॅन
पालिकेकडे केवळ तीन प्रकल्पांचीच नोंद!
महापालिका प्रशासनाच्या परवाना विभागाकडे शहरातील केवळ ३ आरओ प्लांटचीच नोंदणी आहे. सध्या अकोला शहरामध्ये ३०६ च्यावर थंडगार पाण्याचे प्रकल्प आहेत. म्हणजे सर्वच पाण्याचे प्रकल्प अवैधरीत्या सुरू आहेत. अनेकांकडे शासनाची परवानगी नसताना, आरओ प्लांट सुरू आहेत. परंतु त्यांच्याविरुद्ध महापालिका प्रशासनाला कारवाई करण्यास वेळ नाही. आतापर्यंत मनपा प्रशासनाने एकाही आरओ प्लांटविरुद्ध कारवाई केली नाही.
कोरोनामुळे सध्या लग्न समारंभ व इतर कार्यक्रम बंद आहेत. शाळा, महाविद्यालये बंद आहे. शासनाने व्यवसायाची वेळ कमी केल्यामुळे दुकानदार, व्यावसायिकांनी पाण्याच्या कॅन बंद केल्या आहेत. त्यामुळे कॅनमधील पाण्याचा व्यवसाय अडचणीत सापडला आहे.
-प्रवीण भिवगडे, विक्रेता
कोरोनामुळे थंडगार पाणी कोणी पीत नाही. माठातील व घरातील साधे पिणे सोयीचे आहे. उगाच आरोग्यासोबत खेळ नको. उन्हाळ्याचे दिवस असूनही थंड पाणी पिणे सध्या टाळत आहोत. त्यामुळे दुकानातील कॅनचे पाणी बंद केले आहे.
-रवींद्र देशमाने, दुकानदार