सोने-चांदीची एक मिलीग्रॅम मोजणी शक्यच नाही!

By Admin | Published: March 28, 2015 01:51 AM2015-03-28T01:51:09+5:302015-03-28T01:51:09+5:30

वैध मापनशास्त्र विभागाचा निर्णय ज्वेलर्स व्यावसायिकांना अमान्य; लोकमत परिचर्चेत उमटला सूर.

Can not count gold and silver one milligram! | सोने-चांदीची एक मिलीग्रॅम मोजणी शक्यच नाही!

सोने-चांदीची एक मिलीग्रॅम मोजणी शक्यच नाही!

googlenewsNext

अकोला: सोने-चांदीसह मौल्यवान धातूंची विक्री करताना मोजमापात अचूकता येण्यासाठी राज्याच्या वैध मापनशास्त्र विभागाने चक्क एक मिलीग्रॅम वजन निश्‍चित करणारे उपकरण लावण्याचे सराफा व्यावसायिकांना आदेश दिले आहेत. हा प्रकार कमी म्हणून की काय, ग्राहकाच्या मागणीनुसार एक मिलीगॅ्रम वजनाचे मोजमाप शक्य नसल्यास संबंधित ग्राहकाला १0 मिलीग्रॅमसाठी सूट देण्याचा अजब फतवा जारी करण्यात आला असून, येत्या १ एप्रिलपासून आदेशाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश आहेत. या निर्णयाला सराफा असोसिएशनच्यावतीने तीव्र विरोध करण्यात आला असून, ही बाब प्र त्यक्षात शक्य नसल्याचे मत शुक्रवारी ह्यलोकमतह्णने आयोजित केलेल्या परिचर्चेत उमटले. सोने-चांदी व मौल्यवान धातूंच्या खरेदी-विक्री व्यवहारावर नियंत्रण ठेवण्याच्या उद्देशातून वैध मा पनशास्त्र विभागाच्यावतीने सराफा व्यावसायिकांसाठी २७ फेब्रुवारीमध्ये नियमावली तयार केली. यामध्ये सोने-चांदी व मौल्यवान धातूंच्या मोजणीमध्ये अचूकता आणण्यासाठी अवघ्या एक मिलीग्रॅमची मोजणी करणारे तोलन (वजन काटा) उपकरण लावण्याचे निर्देश दिले. शिवाय ग्राहकाने एक मिलीग्रॅमसाठी मोजणीचा आग्रह केल्यास त्याच्या मागणीनुसार मोजणी करून देणे बंधनकारक राहील. ही बाब शक्य नसल्यास ग्राहकाने खरेदी केलेल्या व्यवहारात दहा मिलीग्रॅमपर्यंंतची सूट देण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले. वैध मापन विभागाचा हा निर्णय प्रत्यक्षात शक्य नसून, सराफा व्यावसायिकांसह ग्राहकांना प्रचंड गोंधळात टाकणारा आहे. नेमक्या याच मुद्यावर शुक्रवारी ह्यलोकमतह्णच्यावतीने परिचर्चेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी एक मिलीग्रॅमची मोजणी क रणारे उपक रण अतिशय संवेदनशील असल्याने हवेने किंवा कंपनानेदेखील वजनात चढउतार होत असल्याचा मुद्दा चर्चेदरम्यान समोर आला. या उ पकरणाची किंमत १ लाख रुपयांपेक्षा जास्त असून, गजबजलेल्या दुकानांमध्ये वापरणे शक्यच नसल्याचे मत सराफा व्यावसायिकांनी व्यक्त केले. दुकानात लावण्यात आलेले एक मिलीग्रॅमचे उपकरण योग्यरी त्या काम करीत आहे,याला प्रमाण काय, यावर वैध मापन विभागाने पर्याय सुचवला नाही. मौल्यवान दागिन्यांची मोड करून त्यांचे नवीन दागिने बनविताना मोठय़ा शोरूममध्ये जास्त मजुरी घेतली जाते. त्या तुलनेत किरकोळ व्यावसायिकांकडून कमी दराची आकारणी होते. अशावेळी वैध मापन विभागाचे धोरण किरकोळ व्यावसायिकांसाठी अडचणीचे असल्याने या निर्णयाला तीव्र विरोध असल्याचे सराफा असोसिएशनच्या पदाधिकार्‍यांनी व्यक्त केले. परिचर्चेत ग्राहक पंचायत, ग्राहक मंचचे पदाधिकारी, वैध मापनशास्त्र विभागाचे अधिकारी, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी तसेच प्रतिष्ठित ग्राहकांनी सहभाग घे तला.

Web Title: Can not count gold and silver one milligram!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.