कॅनॉल रोडच्या हस्तांतरणासाठी मुहूर्त सापडेना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2017 01:54 AM2017-10-04T01:54:15+5:302017-10-04T01:56:32+5:30

अकोला : जुने शहरातील डाबकी रोड ते बाळापूर रोडपर्यंतच्या  कॅनॉल रस्त्याची दुर्दशा झाली आहे. पाटबंधारे विभागाच्या अख त्यारीत असलेल्या कॅनॉलची जागा रस्त्यासाठी हस्तांतरित  करण्याचे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांना अधिकार  आहेत. मागील दोन वर्षांपासून ही जागा मिळवण्यासाठी महा पालिका प्रशासनाची धडपड सुरू असली, तरी अद्यापही जिल्हा  प्रशासनाने जागेच्या हस्तांतरणाचा निर्णय घेतला नाही.  

Can not find a canal road transfer! | कॅनॉल रोडच्या हस्तांतरणासाठी मुहूर्त सापडेना!

कॅनॉल रोडच्या हस्तांतरणासाठी मुहूर्त सापडेना!

Next
ठळक मुद्देमनपा ‘वेटिंग’वरजिल्हाधिकार्‍यांच्या भूमिकेकडे लक्ष

आशिष गावंडे । 
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : जुने शहरातील डाबकी रोड ते बाळापूर रोडपर्यंतच्या  कॅनॉल रस्त्याची दुर्दशा झाली आहे. पाटबंधारे विभागाच्या अख त्यारीत असलेल्या कॅनॉलची जागा रस्त्यासाठी हस्तांतरित  करण्याचे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांना अधिकार  आहेत. मागील दोन वर्षांपासून ही जागा मिळवण्यासाठी महा पालिका प्रशासनाची धडपड सुरू असली, तरी अद्यापही जिल्हा  प्रशासनाने जागेच्या हस्तांतरणाचा निर्णय घेतला नाही.  नगरविकास राज्यमंत्री तथा पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी  कॅनॉल रस्त्यासाठी सहा कोटींची तरतूद केली असताना जिल्हा  प्रशासन व महापालिकेला कॅनॉलच्या हस्तांतरणासाठी मुहूर्त सा पडत नसल्यामुळे आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.
अकोला पश्‍चिम विधानसभा मतदारसंघातील सर्वाधिक दाट  लोकवस्तीचा भाग म्हणून जुने शहराकडे पाहिल्या जाते. जुने  शहरात डाबकी रोड, जुना बाळापूर रोड व हरिहरपेठ मार्गाचा  प्रमुख रस्ते म्हणून वापर होतो. सर्वाधिक वर्दळ डाबकी रोडवर  राहत असून, अरुंद रस्त्यामुळे वाहतूक विस्कळीत होण्याचे  प्रकार दैनंदिन झाले आहेत. जुने शहरातील वाहतूक  वळवण्यासाठी कॅनॉल रस्त्याचा एकमेव पर्याय आहे. डाबकी  रोड ते जुना बाळापूर रोडपर्यंत १ हजार ३00 मीटर अंतराच्या  कॅनॉल रस्त्यासाठी मनपाचे तत्कालीन आयुक्त दीपक चौधरी  यांच्या कालावधीत निविदा प्रकाशित करण्यात आली होती.  त्यावेळी प्रशासनाने १ कोटी ६0 लाख रुपयांची तरतूद केली हो ती. पाटबंधारे विभागाच्या अखत्यारीत असलेल्या कॅनॉलची  जागा रस्ते विकासासाठी मनपाकडे हस्तांतरित होणे गरजेचे होते.  यासंदर्भात मनपा प्रशासनाने पाटबंधारे विभाग आणि  जिल्हाधिकार्‍यांकडे वारंवार पाठपुरावा केला. 
कॅनॉल रस्त्याची जागा मनपाकडे हस्तांतरित करण्याचे  जिल्हाधिकार्‍यांना सर्वाधिकार आहेत. जुने शहरातील वाह तुकीची समस्या ध्यानात घेता याविषयी जिल्हा प्रशासनाने ता तडीने निर्णय घेण्याची गरज आहे. 

सहा कोटींची तरतूद केली पण..
जुने शहरातील अरुंद रस्ते, वाहतुकीची कोंडी पाहता  नगरविकास राज्यमंत्री तथा पालकमंत्री डॉ.रणजित पाटील यांनी  वर्षभरापूर्वी डाबकी रोड ते जुना बाळापूर रोड ते थेट राष्ट्रीय  महामार्गावरील नवीन किराणा मार्केटपर्यंंत रस्ता तयार  करण्यासाठी सहा कोटी रुपयांची तरतूद केली. पालकमंत्र्यांनी  निधीची तरतूद केल्यावरही जिल्हा प्रशासन व मनपा  प्रशासनाकडून रस्ते हस्तांतरणाच्या प्रक्रियेला विलंब होतोच  कसा, असा प्रश्न उपस्थित होत आहे. प्रशासकीय यंत्रणांचा  लेटलतिफ कारभार पाहता सहा कोटींचा निधी इतरत्र वळती  करण्याच्या हालचाली सुरू झाल्याची माहिती आहे. 

कॅनॉल अस्तित्वात नाही, तरीही विलंब!
शेतकर्‍यांना सिंचनासाठी उपलब्ध करून दिलेल्या कॅनॉलचे  अस्तित्व कधीचेच संपुष्टात आले आहे. कॅनॉलच्या दोन्ही  बाजूने आता रहिवासी वस्ती आहे. सुमारे १00 फुट रुंदीच्या  कॅनॉलच्या जागेवर स्थानिकांनी दोन्ही बाजूने अतिक्रमण केले  आहे. अतिक्रमणाची समस्या पाहता पाटबंधारे विभाग तसेच  जिल्हा प्रशासनाने ही जागा मनपाकडे तातडीने हस्तांतरित क  रण्याची गरज आहे.
-

Web Title: Can not find a canal road transfer!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.