ग्रामपंचायत निवडणूक जाचक अटी रद्द करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 04:15 AM2020-12-25T04:15:34+5:302020-12-25T04:15:34+5:30

नामनिर्देशनपत्रे स्वीकार करण्यास सुरुवात झाली आहे.निवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्रे भरताना मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहेत.जात पडताळणी अर्ज ऑनलाईन पध्दतीने भरताना ओटीपी ...

Cancel Gram Panchayat election oppressive conditions | ग्रामपंचायत निवडणूक जाचक अटी रद्द करा

ग्रामपंचायत निवडणूक जाचक अटी रद्द करा

Next

नामनिर्देशनपत्रे स्वीकार करण्यास सुरुवात झाली आहे.निवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्रे भरताना मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहेत.जात पडताळणी अर्ज ऑनलाईन पध्दतीने भरताना ओटीपी येत नसल्याने अर्ज भरायला खूप वेळ लागत आहे.त्यामुळे राखीव जागेवर जातपडताळणी अर्ज भरला जात नाही.सोबतच नव्याने बँक खाते उघडण्याचा नियम असल्याने जुने खाते असताना किमान २००० रुपये भरून नव्याने बँक खाते उघडण्यासाठी बँकेच्या पायऱ्या झिजवाव्या लागत आहेत. त्यात देखील मोबाईल लिंक नसल्याने आधी आधार केंद्राला चक्कर घालावी लागते.मोबाईल लिंक होण्यासाठी निदान आठ दिवस लागतील त्यामुळे अनेकांना उमेदवारी अर्ज भरणे शक्य नाही.जुने बँक खाते असताना नवीन खाते उघडण्याचा अट्टाहास कशासाठी असा प्रश्न वंचितने विचारला आहे.

निवडणूक प्रक्रिया किचकट करून सरकारने जाणीवपूर्वक गरीब व साधने नसलेल्या चांगल्या उमेदवारांना बाद करण्याचे सुनियोजित षडयंत्र रचले असावे अशी शंका देखील राजेंद्र पातोडे यांनी व्यक्त केली आहे.

Web Title: Cancel Gram Panchayat election oppressive conditions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.