‘बाळापूर तालुक्याकरिता आरक्षित केलेले पाणी आरक्षण रद्द करा !’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 04:32 AM2020-12-14T04:32:24+5:302020-12-14T04:32:24+5:30
तालुक्यात वान धरण असतानाही नागरिकांना पाणीटंचाईची समस्या जाणवत आहे. बाळापूर तालुक्यात कवठा बॅरेज, नया अंदुरा व नेर धामना ...
तालुक्यात वान धरण असतानाही नागरिकांना पाणीटंचाईची समस्या जाणवत आहे. बाळापूर तालुक्यात कवठा बॅरेज, नया अंदुरा व नेर धामना येथील प्रकल्पांमध्ये जलसाठा साठविणे सुरू झाले असताना वान धरणाचे पाणी बाळापूरसाठी आरक्षित करणे म्हणजे स्थानिक नागरिकांवर अन्याय आहे, असे आमदार अमोल मिटकरी यांनी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे. धरणाचे पाणी आरक्षित केल्याने मुख्य उद्देश असलेल्या सिंचनाला धोका निर्माण होऊ शकतो, तसेच पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होऊ शकते. त्यामुळे धरणाचे पाणी बाळापूर तालुक्यासाठी आरक्षित करणे म्हणजे स्थानिक शेतकरी व नागरिकांवर अन्याय करणे होय, त्यामुळे आरक्षणाचा निर्णय रद्द करावा, अशी मागणी पत्राव्दारे केली आहे. याबाबतची माहिती आमदार अमोल मिटकरी यांनी दिली.