जात पडताळणी पावती जोडूनही नामनिर्देशन पत्र रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:59 AM2021-01-08T04:59:00+5:302021-01-08T04:59:00+5:30

तालुक्यातील ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम घोषित झाल्याप्रमाणे नामनिर्देशन पत्रसुद्धा उमेदवारांनी दाखल केल्यानुसार त्याची छाननीसुद्धा झाली. त्यामध्ये बार्शिटाकळी तालुक्यातील राहीत ...

Cancellation of nomination paper without attachment of caste verification receipt | जात पडताळणी पावती जोडूनही नामनिर्देशन पत्र रद्द

जात पडताळणी पावती जोडूनही नामनिर्देशन पत्र रद्द

Next

तालुक्यातील ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम घोषित झाल्याप्रमाणे नामनिर्देशन पत्रसुद्धा उमेदवारांनी दाखल केल्यानुसार त्याची छाननीसुद्धा झाली. त्यामध्ये बार्शिटाकळी तालुक्यातील राहीत येथील वाॅर्ड क्रमांक १ मधील ओबीसी महिला राखीव म्हणून साधना विनोद श्रीनाथ यांनी अर्ज दाखल केला होता. परंतु त्यांची उमेदवारी छाननीदरम्यान रद्द केल्याची माहिती त्यांना मिळाली. नामनिर्देशन पत्रासाेबत जात पडताळणी पोचपावतीसह सर्व कागदपत्रे जोडली होती, असे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांनीसुद्धा अर्ज परिपूर्ण असल्याचे व कागदपत्रे सुद्धा सर्व योग्य असल्याची खात्री करून घेतल्याचेही त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे. संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांना याबाबत विचारले असता त्यांनी आपण अर्जासोबत जात पडताळणी पोचपावती जोडले नसल्याचे कारणावरून नामनिर्देशन पत्र रद्द केल्याचे सांगितले. पावती ऑनलाइन नामनिर्देशन अर्जासोबत निवडणूक अधिकाऱ्यांकडे सादर केल्याचे सांगितल्यावरही त्यांनी त्यांचे म्हणणे ऐकून न घेतल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

Web Title: Cancellation of nomination paper without attachment of caste verification receipt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.