उमेदवारांनो ‘एबी फॉर्म’ जोडताय, जरा सांभाळून..!
By admin | Published: January 31, 2017 02:13 AM2017-01-31T02:13:40+5:302017-01-31T02:13:40+5:30
पहिल्या उमेदवाराचा ‘एबी फॉर्म’ धरणार गृहीत.
अकोला, दि. ३0- महापालिका निवडणुकीच्या रणसंग्रामात उतरण्यासाठी इच्छुकांची धावपळ, लगबग सुरू झाली आहे. अशा स्थितीत कागदपत्रांची जुळवाजुळव करताना दमछाक होत असून, ज्या ह्यएबी फॉर्मह्णसाठी जीवाचे रान केले जाते, तो अर्ज नामनिर्देशनपत्राला लावताना जो उमेदवार पहिल्यांदा सादर करेल त्याचाच अर्ज अधिकृत समजल्या जाणार असल्याने उमेदवारांनो जरा सांभाळून, असे म्हणण्याची वेळ आली आहे.
महापालिका निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. महापालिका क्षेत्राची हद्दवाढ होऊन २0 प्रभागांची निर्मिती झाली. प्रत्येक प्रभागातून चार या प्रमाणे ८0 उमेदवार निवडून द्यावे लागतील. मनपाने २0 प्रभागांसाठी विविध पाच ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी व कर्मचार्यांची नियुक्ती केली आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या वेळापत्रकानुसार २७ जानेवारी ते ३ फेब्रुवारीपर्यंत उमेदवारांना नामनिर्देशनपत्र (उमेदवारी अर्ज) दाखल करता येतील. यासाठी सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंतचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. यंदा प्रथमच ऑनलाइन पद्धतीने नामनिर्देशनपत्र सादर करावे लागेल. ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर त्याची प्रिंटआउट काढून ती संबंधित झोनच्या निवडणूक निर्णय अधिकार्यांकडे सादर करायची आहे. उमेदवारी अर्ज सादर करताना संबंधित उमेदवाराला ज्या पक्षाकडून ह्यएबी फॉर्मह्ण दिल्या जाईल तो फॉर्म नामनिर्देशनपत्राला जोडावा लागणार आहे. या ठिकाणी एकाच पक्षाच्या दोन उमेदवारांनी एबी फॉर्म सादर केल्यास ज्याचा पहिला अर्ज प्राप्त झाला असेल त्या उमेदवाराचा अर्ज अधिकृत मानल्या जाणार आहे. त्यामुळे संबंधित राजकीय पक्षाकडून एबी फॉर्म प्राप्त करताना तो एकाच उमेदवाराला दिल्या जावा, अशी चर्चा इच्छुकांमध्ये सुरू झाली आहे.
सर्व्हर 'डाउन' होण्याची भीती
महापालिका निवडणुकीसाठी ऑनलाइन पद्धतीने उमेदवारी अर्ज कोणत्याही ठिकाणहून भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. राजकीय पक्षांकडून एबी फॉर्म प्राप्त होण्यास जाणीवपूर्वक विलंब होण्याची शक्यता लक्षात घेता इच्छुक उमेदवारांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज सादर करण्यावर मतेमतांतरे सुरू झाली आहेत. अशा स्थितीत ऑनलाइन अर्ज भरण्यास उशीर करून शेवटच्या दिवशी ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी गर्दी झाल्यास त्या दिवशी सर्व्हरवर ताण येऊन त्याची गती संथ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेवटच्या दिवसाची वाट न पाहता उमेदवारांनी त्यांचे अर्ज भरण्याची गरज आहे.