उमेदवारांना सादर करावी लागणार जात पडताळणीसाठी केलेल्या अर्जाची पाेचपावती !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 04:32 AM2020-12-14T04:32:31+5:302020-12-14T04:32:31+5:30
अकोला : ग्रामपंचायत निवडणुकीत आरक्षित जागेवर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना उमेदवारी अर्ज दाखल करताना जात पडताळणी समितीकडे जातवैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी ...
अकोला : ग्रामपंचायत निवडणुकीत आरक्षित जागेवर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना उमेदवारी अर्ज दाखल करताना जात पडताळणी समितीकडे जातवैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी सादर केलेल्या अर्जाची पोचपावती व हमीपत्र सादर करावे लागणार आहे. पोचपावती व हमीपत्र घेऊन उमेदवारी अर्ज स्वीकारण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील तहसीलदारांना ११ डिसेंबर रोजी दिले.
एप्रिल ते डिसेंबरपर्यंत मुदत संपलेल्या राज्यातील ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम ११ डिसेंबर रोजी राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला. त्यानुसार आरक्षित जागांवर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांकडून जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करणार असल्याचे हमीपत्र आणि जिल्हा जात पडताळणी समितीकडे जातवैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी सादर केलेल्या अर्जाची पोचपावती घेऊन उमेदवारी अर्ज स्वीकारण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगामार्फत राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांना ११ डिसेंबर रोजी पत्राव्दारे देण्यात आले. त्यानुसार आरक्षित जागांवर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील हमीपत्र आणि जात पडताळणी समितीकडे जातवैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी सादर केलेल्या अर्जाची पोचपावती घेऊन उमेदवारी अर्ज स्वीकारण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी जिल्ह्यातील सातही तहसीलदारांना ११ डिसेंबर रोजी पत्राव्दारे दिले.
ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत आरक्षित जागांवर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांकडून जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करणार असल्याचे हमीपत्र व जात पडताळणी समितीकडे जातवैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी सादर केलेल्या अर्जाची पोचपावती घेऊन उमेदवारी अर्ज स्वीकारण्याचे निर्देश जिल्ह्यातील सातही तहसीलदारांना देण्यात आले.
संजय खडसे, निवासी उपजिल्हाधिकारी