अतिक्रमणामुळे राज्य महामार्गावर काेंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 04:53 AM2020-12-04T04:53:01+5:302020-12-04T04:53:01+5:30
वीज वारंवार खंडित गांधीग्राम : सततच्या विजेच्या लपंडावामुळे ग्रामीण भागातील जनता त्रस्त झाली आहे. दिवसातून आठ ते दहा ...
वीज वारंवार खंडित
गांधीग्राम : सततच्या विजेच्या लपंडावामुळे ग्रामीण भागातील जनता त्रस्त झाली आहे. दिवसातून आठ ते दहा वेळा वीज पुरवठा खंडित होत असल्याने घरातील विद्युत उपकरणे खराब होण्याचा धोका निर्माण झाला आहे. गांधीग्राम, गाेपाळखेड भागात कमी वीज दाबाचा पुरवठा होत आहे.
वाळूचा अवैध उपसा सुरूच!
अकाेला : तालुक्यात मोठ्या प्रमाणात वाळू माफिया वाळूचा उपसा करीत आहेत; मात्र तलाठी, मंडळ अधिकारी व वन विभाग अधिकारी कसल्याही प्रकारची कारवाई करीत नसल्याने लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या वाळू घाटाची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
किसान सन्मान योजनेपासून वंचित
अकाेला : सरकारने कोरोना संकटकाळात दिलासा मिळावा यासाठी किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून २ हजार रुपयांचा हप्ता जमा केला. या योजनेतून अनेक लाभ मिळाला; मात्र अद्यापही अनेक शेतकऱ्यांना वारंवार शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजवूनही योजनेचा लाभ मिळत नाही, असा आराेप शेतकरी जागर मंचने केला आहे.
संथ रस्ता कामामुळे अपघातांची शक्यता
अकाेला : शहरातील जेल चाैक ते वाशिम नाका या मार्गाचे काम अतिशय संथ गतीने हाेत असल्यामुळे वाहतुकीची काेंडी हाेत असून, त्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. या रस्त्यावर कामाचे साहित्य रस्त्यावर पसरले आहे. त्यामुळे रस्ते अरुंद होत आहेत. तसेच रात्री पथदिवेही बंद असतात.
रस्त्यावरील धुळीमुळे पिके धोक्यात
अकाेला : अकाेला ते अकाेट रस्त्यावर मुरूम टाकल्याने त्याची माती झाली आहे. याची धूळ शेतातील पिकांवर उडत असून, पीक नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. याकडे लक्ष देण्याची गरज शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.
उघडे राेहित्र धाेकादायक
अकाेला : शहरात अनेक विद्युत पेट्यांची दारे तुटलेली आहे. यामुळे त्या धोक्याच्या ठरत आहे. काही ठिकाणी शेतात तर कुठे लोकवस्तीत असल्याने अपघाताची शक्यता आहे. अनेकदा महावितरणकडे तक्रारी केल्यावरही दुर्लक्ष करतात.