किराणा दुकानातून गांजा विक्रीचा पर्दाफाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:17 AM2021-03-15T04:17:05+5:302021-03-15T04:17:05+5:30

शहर पोलिस उपअधीक्षक यांच्या विशेष पथकाची कारवाई अकोला : रामदास पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोहता मिलरोडवर एका किराणा दुकानातून ...

Cannabis sale from grocery store exposed | किराणा दुकानातून गांजा विक्रीचा पर्दाफाश

किराणा दुकानातून गांजा विक्रीचा पर्दाफाश

Next

शहर पोलिस उपअधीक्षक यांच्या विशेष पथकाची कारवाई

अकोला : रामदास पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोहता मिलरोडवर एका किराणा दुकानातून गांजाची मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याच्या माहितीवरून शहर पोलीस उपअधीक्षक यांच्या विशेष पथकाने शनिवारी रात्री छापा टाकून गांजा जप्त केला. या ठिकाणावरून किराणा दुकानदारास ताब्यात घेण्यात आले आहे.

मोहता मिलरोडवरील मुसा कॉलनी येथील फैजान किराणा शॉप या दुकानातून अमली पदार्थांची विक्री करण्यात येत असल्याची माहिती शहर पोलीस उपअधीक्षक सचिन कदम यांच्या विशेष पथकाला मिळाली. या माहितीवरून त्यांच्या विशेष पथकाने पाळत ठेवून किराणा दुकानाचा मालक राजीक खान लतीफ खान वय २० वर्ष राहणार मोहता मिल चाळ रोड यास ताब्यात घेतले. त्याच्याकडून किराणा दुकानातील एक किलो २०० ग्राम गांजा जप्त करण्यात आला आहे. अकोला शहरात तसेच ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात गांजा विक्री होत असल्याचे यावरून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी रामदासपेठ पोलीस ठाण्यात आरोपी राजीक खान लतीफ खान यांच्याविरुद्ध एनडीपीएस ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई विशेष पथकाचे महेन्द्र बहादुरकर, विनय जाधव, राज चंदेल, हरणे मेजर यांनी केली.

अमली पदार्थ विक्रीवर कारवाईचे सत्र

शहरासह जिल्ह्यात विविध ठिकाणी गांजा तसेच इतर अमली पदार्थ विक्री होत असल्याच्या माहितीवरून पोलीस अधीक्षक यांचे विशेष पथक व शहर पोलीस उपअधीक्षक सचिन कदम यांच्या विशेष पथकाने छापेमारी करीत मोठ्या प्रमाणात गांजा तसेच इतर अमली पदार्थ जप्त केले आहे.

Web Title: Cannabis sale from grocery store exposed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.