हरिणाला वाचविण्याच्या प्रयत्नात कार उलटली; दोघे जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2019 12:56 PM2019-03-10T12:56:44+5:302019-03-10T12:57:42+5:30
खेट्री (अकोला): अचानक समोर आलेल्या हरिणाला वाचविण्यासाठी ब्रेक लावल्यामुळे भरधाव कार उलटल्याची घटना पातूर मार्गावरील विवरा फाट्यानजीक रविवारी सकाळी घडली.
खेट्री (अकोला): अचानक समोर आलेल्या हरिणाला वाचविण्यासाठी ब्रेक लावल्यामुळे भरधाव कार उलटल्याची घटना पातूर मार्गावरील विवरा फाट्यानजीक रविवारी सकाळी घडली. सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही प्राणहानी झाली नसून, दोन जण जखमी झाले.
उमरा येथील शंकर रमेश नागोलकार, हे त्यांच्या मारुती ओमनी व्हॅन या वाहनात कचोरी विकण्याचा व्यवसाय करतात. नित्यनियमाप्रमाणे ते रविवारी सकाळी एम. एच. १९ ए. ई.७८३८ क्रमांकाच्या वाहनाद्वारे उमरा येथून पातुरकडे निघाले होते. विवरा फाट्यावर रस्ता ओलांडण्याच्या प्रयत्ना असलेलेहरिण त्यांच्या वाहनासमोर आले. त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात शंकर नागोलकर यांनी करकचून ब्रेक दाबले. यामुळे वाहनावरील नियंत्रण सुटून ते रस्त्याच्या बाजूला खड्ड्यात जाऊन उलटले. शंकर नागोलकार यांच्यासह दोघे किरकोळ जखमी झाले. यामध्ये गाडीमध्ये ५ हजार रुपये किमतीच्या कचोऱ्यांचे नुकसान झाले. तसेच गाडीच्या चुराडा झाला. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.