अकोल्यात चोरलेल्या मोटारसायकलसह नागपुरात सापडली कार

By नितिन गव्हाळे | Published: September 19, 2023 07:32 PM2023-09-19T19:32:26+5:302023-09-19T19:33:20+5:30

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई ; आरोपीला अटक

Car along with motorcycle stolen from Akola found in Nagpur | अकोल्यात चोरलेल्या मोटारसायकलसह नागपुरात सापडली कार

अकोल्यात चोरलेल्या मोटारसायकलसह नागपुरात सापडली कार

googlenewsNext

नितीन गव्हाळे

अकोला : रामदास पेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतून चोरलेल्या मोटारसायकली नागपुरातील गांधीबाग परिसरात आढळून आल्या आहेत. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपींना जेरबंद करीत, त्यांच्याकडून एक चारचाकी व दोन दुचाकी असा पाच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई मंगळवारी दुपारी केली.

गत काही महिन्यांपासून शहरातील विविध भागातून चारचाकी, दुचाकी वाहने चोरीला जात असल्याच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी चोरट्यांना जेरबंद करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शंकर शेळके यांनी पथकाला दुचाकी चोरणारी टोळीचा शोध घेण्याबाबत सूचना दिल्या.

एलसीबी पथकाने १८ सप्टेंबररोजी नागपूर येथून दोघांना ताब्यात घेतले. यात भालदारपुरा गांधीबाग, नागपूर येथील नोमान अखलाक अहमद (२०) आणि शेख अमजत शेख आजम (१९) यांचा समावेश होता. शेख अमजत हा अकोल्यातील वाशिम बायपास परिसरातील हमजा प्लॉट येथील रहिवाशी असून, सध्या नागपुरात रहिवाशी आहे. या दोन्ही आरोपीकडून चार लाख रुपये किंमतीची एक टाटा एसव्ही (एमएच ३० एबी १७५९), दुचाकी (एमएच ३० बी ३६९४), (एमएच ३० बीजे ८६६३) क्रमांकाची असा एकूण पाच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पोलिस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलिस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनात पीएसआय गोपाल जाधव, एएसआय दशरथ बोरकर, फिरोज खान, उमेश पराये, गोकुळ चव्हाण, प्रमोद डोईफोडे, भास्कर धोत्रे, खुशाल नेमाडे, आकाश मानकर, धीरज वानखडे, मोहम्मद आमीर, अभिषेक पाठक, अन्सार अहेमद, लिलाधर खंडारे, स्वप्नील खेडकर, स्वप्निल चौधरी, प्रसांत लोखंडे, सायबर पोलिस आशिष आमले आदींनी केली.
फोटो:

Web Title: Car along with motorcycle stolen from Akola found in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.