कारने दुचाकीस्वारास उडविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2017 08:32 PM2017-08-02T20:32:34+5:302017-08-02T20:33:10+5:30
शिर्ला : शिर्ला-पातूर दरम्यान दुचाकीने शेतात जाणार्या इसमाच्या दुचाकीला तिच्या मागच्या बाजुने येणार्या कारने भरधाव वेगाने उडवले. ही घटना २ ऑगस्ट रोजी सकाळी घडली. या अपघातात त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला
लोकमत न्यूज नेटवर्क
शिर्ला : शिर्ला-पातूर दरम्यान दुचाकीने शेतात जाणार्या इसमाच्या दुचाकीला तिच्या मागच्या बाजुने येणार्या कारने भरधाव वेगाने उडवले. ही घटना २ ऑगस्ट रोजी सकाळी घडली. या अपघातात त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला
निसार फर्निचरजवळ सै. अफसर सै. इमाम यांना मागून येणार्या एमएच ३0 बीसी २८१५ क्रमांकाचमृकाचे मुलीने दिलेल्या फिर्यादवरून उपरोक्त वाहनाच्या चालकाविरुद्ध भादंविच्या २७९, ३३७, ३0४ (अ) कलमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्या आला. पुढील तपास पीआय प्रकाश झोडगे यांच्या मार्गदर्शनात एएसआय संजय पवार करीत आहेत.
नाव साधर्मामुळे काही काळी शिर्लात दु:खाचे वातावरण
अफसरखाँ नावाचा व्यक्ती शिर्लातही आहे. तसेच या अ पघातातील मृतकाचे नावही अफसर होते. दोघांकडेही टीव्हीएस कंपनीची सारखीच दुचाकी असल्याने शिर्लातील अफसरखाँ यांची मुलगी अनिसा पठाण ही जखमी वडिलांना भेटण्यासाठी अकोल्याच्या बिलाला हॉस्पिटलमध्ये प्रकाश अंधारे यांच्या मदतीने पोहोचली. तेथे अफसर यांच्या मृत्युची बातमी कळताच अनिसाच्या पायाखालची वाळू सरकली. मात्र नंतर घरी फोन लावला तेव्हा प्रत्यक्ष अफसरखाँशी बोलणे झाल्याने सर्वांचा जीव भांड्यात पडला. एकीकडे दु:खाचे वातावरण असले तरी दुसरीकडे जीव वाचल्याचे समाधान होते.