लोणार नदीच्या पात्रात कार कोसळली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 04:15 AM2020-12-26T04:15:30+5:302020-12-26T04:15:30+5:30
बोरगाव मंजू: पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अकोला ते म्हैसाग मार्गावरील आपातापा नजीकच्या लोणार नदीचे पात्र पार करताना प्रवासी कार कोसळल्याची ...
बोरगाव मंजू: पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अकोला ते म्हैसाग मार्गावरील आपातापा नजीकच्या लोणार नदीचे पात्र पार करताना प्रवासी कार कोसळल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. या अपघातात कारमधील प्रवासी किरकोळ जखमी झाले, सुदैवाने जीवितहानी टळली.
प्राप्त माहितीनुसार, अकोल्याकडून कार (टाटा सुमो) क्रमांक एमएच ३० एए ३६८५ प्रवासी घेऊन जात होती दरम्यान, नवनिर्माधिन लोणार नदीच्या पात्रावर पुलाचे बांधकाम सुरू असून सदर पुलाला कठडे नसल्याने सदर कार पुलाच्या कडेला कोसळली. या अपघातात कारमधील प्रवासी किरकोळ जखमी झाले. या अपघातातील कारचे नुकसान झाले. दरम्यान, या मार्गावर नवनिर्माधिन पुलाचे काम सुरू आहे, पुलाला कठडे नसल्याने गत २१ डिसेंबर रोजी एका मालवाहू ट्रकला अपघात झाला होता. दरम्यान, एकाच आठवड्यात ही दुसरी घटना आहे. हे विशेष. या मार्गावरील वाहतूक लक्षात घेऊन संबंधित विभागाने दखल घेणे गरजेचे आहे, अशी वाहन चालकांसह सर्वसामान्य जनतेची मागणी आहे.
फोटो