कारची दुचाकीस धडक; दोन ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2017 02:57 AM2017-07-29T02:57:45+5:302017-07-29T02:58:06+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
चोहोट्टा बाजार : भरधाव कारने दुचाकीस धडक दिल्याने अंबोडा येथील ‘लोकमत’चे वार्ताहर मोहन पिंपळकर व एक महिला हे दोघे ठार झाले. ही घटना चोहोट्टा फाट्याजवळ गुरुवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास घडली. आरोपी कारचालकाविरुद्ध दहीहांडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, घटनास्थळावरून फरार आरोपीला दहीहांडा पोलिसांनी शुक्रवारी सकाळी अटक केली.
अकोला मार्गावरून येणाºया एमएच ३० एएक्स ११८४ क्रमांकाच्या दुचाकीला अकोट मार्गावरून येणाºया एमएच ३७ जी १६५३ क्रमांकाच्या कारने जबर धडक दिली. या घटनेत दुचाकी चालक आंबोडा येथील मोहन पिंपळकर हे गंभीररीत्या जखमी झाले होते. घटनेची माहिती मिळताच दहीहांडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार गणेश वनारे, पो.हे.काँ. सुरेश वाघळकर, मुन्ना ठाकूर यांनी तत्काळ रुग्णवाहिका बोलावून जखमींना उपचारासाठी अकोला येथे पाठविले; परंतु दुचाकीचालक मोहन पिंपळकर यांचा वाटेतच मृत्यू झाला. दुचाकीवर असलेल्या करोडी येथील लता गाडेकर नामक महिलासुद्धा गंभीररीत्या जखमी झाली होती; परंतु उपचारादरम्यान आज पहाटे त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी चालकाविरुद्ध कलम ३०४ नुसार गुन्हा दाखल करून फरार आरोपी कारचालक विनोद पंजाबराव गावंडे रा. किनखेडपूर्णा याला शुक्रवारी सकाळी अटक केली. याप्रकरणी पुढील तपास ठाणेदार गणेश वनारे करीत आहेत.