कार झाडावर आदळली : तीन गंभीर

By admin | Published: April 17, 2017 01:55 AM2017-04-17T01:55:46+5:302017-04-17T01:55:46+5:30

हिवरखेड : अकोटवरून हिवरखेड येथे जात असताना चितलवाडी फाट्याजवळ कार झाडावर आदळल्याने तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना १६ एप्रिल रोजी दुपारी ३.३० वाजता घडली.

The car struck the tree: three serious | कार झाडावर आदळली : तीन गंभीर

कार झाडावर आदळली : तीन गंभीर

Next

हिवरखेड : अकोटवरून हिवरखेड येथे जात असताना चितलवाडी फाट्याजवळ कार झाडावर आदळल्याने तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना १६ एप्रिल रोजी दुपारी ३.३० वाजता घडली. पोलिसांनी जखमींना अकोला येथे पाठविले. पातूर येथील तिघे अकोट मार्गे हिवरखेड येथे नातेवाइकाकडे अल्टो क्र. एमएच ३० एएफ ७५५८ या कारने जात होते. दरम्यान, चितलवाडी फाट्याजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी झाडावर आदळली. त्यामधील त्र्यंबक खंदारे, निरंजन बंड, सुधीर देशमुख हे तिघे गंभीर जखमी झाले. पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेऊन जखमींना अकोला येथे उपचारासाठी रवाना केले. हिवरखेड पो. स्टे.चे शरद भस्मे, हवालदार शिरसाट, पवार पुढील तपास करीत आहेत.

Web Title: The car struck the tree: three serious

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.