एसटी आगारातील ‘त्या’ विक्रेत्यांची गाडी पुन्हा रुळावर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:23 AM2021-08-21T04:23:35+5:302021-08-21T04:23:35+5:30
आगारातील अधिकृत विक्रेते २० दररोज सुटणाऱ्या बस ३० विक्रेते म्हणतात... काही महिन्यांपासून निर्बंध असल्याने व्यवसाय ठप्प होता. त्यामुळे आर्थिक ...
आगारातील अधिकृत विक्रेते
२०
दररोज सुटणाऱ्या बस
३०
विक्रेते म्हणतात...
काही महिन्यांपासून निर्बंध असल्याने व्यवसाय ठप्प होता. त्यामुळे आर्थिक अडचणीही वाढल्या होत्या. बसस्थानकात गर्दी वाढू लागली आहे. त्यामुळे व्यवसायदेखील काही प्रमाणात चांगला सुरू आहे.
- अन्वर शहा
निर्बंध हटल्यानंतरही प्रवासी नसल्याने व्यवसाय जवळपास बंदच होता. काही दिवसांपासून प्रवासी संख्या वाढली आहे. त्यामुळे व्यवसायही सुरळीत होत आहे. मागील काही महिने कठीण परिस्थिती होती.
- राजू गिते
एसटी महामंडळाला चुकवितात शुल्क!
एसटी आगार क्रमांक २ च्या परिसरात विक्री करण्यासाठी या छोट्या विक्रेत्यांना एसटी महामंडळाला मासिक शुल्कही चुकवावे लागते. यामध्ये प्रत्येकी १ हजार ते १७०० रुपयांपर्यंत हे शुल्क आहे. याकरिता निविदा प्रसिद्ध करण्यात येत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
बसला पूर्ण प्रतिसाद मिळण्याची प्रतीक्षा
गत दोन महिन्यांपासून निर्बंध हळूहळू शिथिल होत आहेत. या परिस्थितीतही एसटी महामंडळाच्या बसना अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. काही फेऱ्या मोजक्याच प्रवाशांवर सोडाव्या लागत आहेत; मात्र या बसला प्रवाशांकडून पूर्णपणे प्रतिसाद मिळण्याची प्रतीक्षा लागली आहे. यामुळे या विक्रेत्यांनाही फायदा होईल.