बेवारस ७० वर्षीय वृद्धावर उपचार करून पाेहाेचवले घरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 04:14 AM2020-12-27T04:14:42+5:302020-12-27T04:14:42+5:30
मूर्तिजापूर : येथील बसस्थानकात एक वयोवृद्ध इसम दोन दिवसांपासून बेवारस स्थितीत पडलेला हाेता. याबाबतची माहिती वंदे मातरम आपत्कालीन पथकाला ...
मूर्तिजापूर : येथील बसस्थानकात एक वयोवृद्ध इसम दोन दिवसांपासून बेवारस स्थितीत पडलेला हाेता. याबाबतची माहिती वंदे मातरम आपत्कालीन पथकाला मिळताच, पथकाच्या सदस्यांनी त्या वृद्धाला २६ डिसेंबर रोजी उप-जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. वृद्धावर उपचार करून वंचित आपत्कालीन पथकाच्या सदस्यांनी वृद्धास दर्यापूर बनोसा येथे घरी पाेहाेचवून सेवाभाव जपला आहे.
एक अनोळखी ७० वर्षीय वृद्ध इसम गत दोन दिवसांपासून आजारी असल्याने एकाच जागेवर पडून असल्याची माहिती येथील वंदे मातरम आपत्कालीन पथकाला मिळताच टिमने घटनास्थळ गाठून वृद्धाला येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करून त्याच्यावर उपचार केले. दरम्यान, वृद्धाचे नाव कालुराम गणेश शर्मा, रा. दर्यापूर बनोसा असे आहे. वृद्धाला तत्काळ उपचारार्थ दाखल करून वंदे मातरम आपत्कालीन पथकाचे, तसेच वंचित आपत्कालीन पथकाने वृद्धास घरी पाेहाेचवून मानवतावादी कार्याचा परिचय दिला. याबद्दल पथकातील सदस्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.