मालगाडीच्या डब्यातील कोळसा पेटला; अकोला रेल्वे स्थानकावर थांबविली मालगाडी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2017 10:29 PM2017-12-31T22:29:30+5:302017-12-31T22:37:10+5:30
अकोला : रेल्वे स्टेशनवरील फलाट क्रमांक १ आलेल्या मालगाडीच्या डब्यातील कोळशाने पेट घेतल्याचे दिसून आले. यावेळी मालगाडी थांबवून मनपा अग्निशमन विभागाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाने मालगाडीच्या डब्यातील पेटलेल्या कोळशावर पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : रेल्वे स्टेशनवरील फलाट क्रमांक १ आलेल्या मालगाडीच्या डब्यातील कोळशाने पेट घेतल्याचे दिसून आले. यावेळी मालगाडी थांबवून मनपा अग्निशमन विभागाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाने मालगाडीच्या डब्यातील पेटलेल्या कोळशावर पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली. रेल्वे मालगाडी थांबविल्यामुळे नागपूरकडून मुंबई, पुणेकडे जाणार्या रेल्वेगाड्या काहीवेळ थांबवून ठेवण्यात आल्या होत्या.
कोळशाने भरलेली मालगाडी खंडवा जाण्यासाठी कुरूम रेल्वे स्टेशनवरून जात अस ताना, स्टेशन उप अधीक्षकांना मालगाडीच्या डब्यामध्ये कोळशातून धूर निघत असल्याचे दिसून आले. त्यांनी ही माहिती तातडीने भुसावळ येथील नियंत्रण कक्षाला दिली. नियंत्रण कक्षाने मालगाडीचा चालक व गार्डला मालगाडी अकोला रेल्वे स्टेशनवर थांबविण्याची सूचना दिली. अकोला रेल्वे स्टेशनवर मालगाडी थांबल्यावर रेल्वे प्रशासनाने मनपा अग्निशमन विभागाला पाचारण केले. रेल्वे स्टेशनवर आल्यावर अग्निशमन विभागाच्या कर्मचार्यांनी मालगाडीच्या डब्यातील कोळशावर पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली. रेल्वे फलाटांवर रेल्वेगाड्यांची प्रतीक्षा करणार्या प्रवाशांमध्ये रेल्वेगाडीमध्ये आग लागल्याची अफवा पसरल्याने, एकच खळबळ उडाली होती. मालगाडीच्या डब्यातील कोळसा थंड झाल्यानंतर, ही गाडी भुसावळमार्गे रवाना झाली. (प्रतिनिधी)
छाया : 0१ सीटीसीएल : २0 (मालगाडीच्या डब्यातील धुमसणार्या कोळशावर पाण्याचा मारा करताना मनपा अग्निशमन विभागाचे कर्मचारी.)