मालवाहूची कारला धडक; चार जखमी

By admin | Published: February 5, 2017 02:16 AM2017-02-05T02:16:45+5:302017-02-05T02:16:45+5:30

भरधाव मालवाहू गाडी व कार यांच्यात समोरासमोर धडक झाल्याने चार जण जखमी

Cargo hit by car; Four injured | मालवाहूची कारला धडक; चार जखमी

मालवाहूची कारला धडक; चार जखमी

Next

माना(अकोला), दि. ४- भरधाव मालवाहू गाडी व कार यांच्यात समोरासमोर धडक झाल्याने चार जण जखमी झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्गावर मलकापूरजवळ रात्री १0 वाजता घडली.
मालवाहू क्र.एमएच ४९-२२८४ गुरे घेऊन राष्ट्रीय महामार्गाने जात होता. दरम्यान, समोरुन येत असलेल्या कार क्र.एमएच ४९ आर-५५२२ व मालवाहूची मलकापूर गावाजवळ समोरासमोर धडक झाली.
यामध्ये कारमधील चार जण जखमी झाले, तसेच मालवाहूमधील एका गुराचा मृत्यू झाला. मालवाहूमध्ये ११ गुरे होती. अपघातानंतर मालवाहू चालकाने घटनास्थळावरून पळ काढला.
याप्रकरणी माना पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार माळी यांच्या मार्गदर्शनात दिलीप महल्ले, संदीप पवार, विनोद तायडे करीत आहेत.

Web Title: Cargo hit by car; Four injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.