मांसाची वाहतूक करणारा ट्रक जप्त

By Admin | Published: September 22, 2014 12:39 AM2014-09-22T00:39:20+5:302014-09-22T00:39:20+5:30

बुलडाणा जिल्हय़ाच्या हद्दीवर पोलिसांची कारवाई, १0 टन अवैध मांस जप्त.

Cargo truck seized | मांसाची वाहतूक करणारा ट्रक जप्त

मांसाची वाहतूक करणारा ट्रक जप्त

googlenewsNext

डोणगाव (बुलडाणा) : बुलडाणा जिल्हय़ाच्या सरहद्दीवर नाकाबंदीच्या दरम्यान पोलिसांनी अवैध मांसाची वाहतूक करणारा ट्रक ताब्यात घेतला. ही कारवाई आज २१ सप्टेंबर रोजी डोणगाव पोलिसांनी केली. त्यामध्ये ट्रकसह ५ लाख रुपयांचे १0 टन अवैध मांस जप्त करण्यात आले आहे. सध्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर जिल्हय़ात सर्व मुख्य रस्त्यावर पोलिसांकडून नाकाबंदी करून सर्व वाहनांची तपासणी सुरू आहे. डोणगाव येथेही जिल्हय़ाच्या हद्दीवर नाकाबंदी करण्यात आली होती.
दरम्यान, स्थानिक विद्युत वितरण कंपनीच्या उपकेंद्राजवळ ठाणेदार डी.एम. घुगे, पोहेकाँ शरद बाठे, उमेश वाघ, शेख आसिफ, संजय ओशलकर, भानुसे हे रात्रीदरम्यान नाकाबंदी करीत होते. तेव्हा अमरावतीकडून येणारा एम.एच. ४३ ई ६३१८ क्रमांकाच्या ट्रकची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये अवैधरित्या मांसाची वाहतूक होत असल्याचे आढळून आले.
पोलिसांनी ट्रकमधील मांस व सोबत ट्रकही जप्त केला. मांसाची अवैध वाहतूक करणारे सैय्यद सद्दाम हुसेन सैय्यद अलताफ हुसेन, इक्राम अहेमद शेख चाँद, इम्रान खान अफसर खान, जाकीर अहेमद अब्दुल समद रा. अमरावती व अबीद अहेमद अ. जलील रा. कारंजा जि. वाशिम यांच्याविरुद्ध कलम ६ (१), (२), ७९ महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा सहकलम १८२, १८४, ८३/१७७ मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर ट्रकमध्ये दहा टन मांस अंदाजे किंमत ५ लाख रुपये व अंदाजे ३ लाख रुपये किमतीचा ट्रक असा एकूण ८ लाख रुपयांचा मुद्देमाल डोणगाव पोलिसांनी जप्त करून चारही आरोपींना अटक केली आहे. डोणगाव राज्य महामार्गावर अमरावतीवरून औरंगाबादकडे नियमित अवैध मांस वाह तूक होत असते; परंतु ठाणेदार घुगे यांनी अवैध मांस वाहतुकीवर अचानक केलेल्या कारवाईमुळे अवैध मांस वाहतूक करणार्‍यांचे धाबे दणाणले.

Web Title: Cargo truck seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.