सतरंजी उद्योगावर अवकळा; बेरोजगारी वाढली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2019 12:59 PM2019-08-26T12:59:59+5:302019-08-26T13:00:29+5:30

पाच वर्षांकरिता विस्थापित होऊन नंतर स्थलांतरित झाल्याने आजपर्यंत एकही उद्योग या मतदारसंघात आणला नाही.

Carpet industry slow down; Unemployment increased! | सतरंजी उद्योगावर अवकळा; बेरोजगारी वाढली!

सतरंजी उद्योगावर अवकळा; बेरोजगारी वाढली!

googlenewsNext

- विजय शिंदे  
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोट: अकोट शहरात संतरज्या बनविण्याचा प्रसिद्ध उद्योग होता. या ठिकाणाहून राज्यात संतरज्या जात होत्या. तो उद्योग बंद झाला. अनेक बेरोजगार झाले. अनेक बाहेरचे उमेदवार आले. आमदार झाले. पाच वर्षांकरिता विस्थापित होऊन नंतर स्थलांतरित झाल्याने आजपर्यंत एकही उद्योग या मतदारसंघात आणला नाही. त्यामुळे बेरोजगारी भरमसाट वाढल्याने आगामी निवडणुकीत स्थानिक उमेदवारीच्या मुद्यावर भर दिल्या जात आहे.
अकोट मतदारसंघात राज्यातून लोक येतात. आमदार बनण्यासाठी, सोयीचे राजकारण करतात आणि पाच वर्षांसह कायमस्वरूपी कुटुंबाची सोय करून घेतात. अखेर स्थानिक युवक बेरोजगार राहतो. कार्यकर्ते फक्त संतरज्या उचलण्यात धन्यता मानतात. ना स्वाभिमान, ना स्वत:ची ना आपल्या मुलांच्या भवितव्याची चिंता अशा विविध पक्ष, संघटनेचे कार्यकर्ते अल्पसंतुष्ट बनलिले गेले आहेत. अकोट मतदारसंघात संतरज्यांचा उद्योग जुनाच आहे. फक्त आयात-निर्यात धोरण बदलले आहे; पंरतु आता मानसिकता बदलायला लागल्याचे दिसते. त्यामुळे स्थानिकची मागणी जोर धरत असल्याने कोणता पक्ष स्थानिक कार्यकर्त्याला आमदार बनविणार की संतरज्या उचलण्याकरिता वापर करणार, हे लक्षवेधक ठरणार आहे. कित्येकदा स्थानिक आमदार झाला; पण सत्ता नव्हती. जेव्हा सत्ता आली तर स्थानिक आमदार नव्हता. तरीपण स्थानिक बेरोजगारी दूर करण्यासाठी एकही उद्योग, धंदा, शासनाच्या योजनेतून अर्थसाहाय्य मिळू शकले नाही, हे वास्तव आहे. एमआयडीसीमध्येसुद्धा पाहिजे असे उद्योग उभे राहिले नाही. उलट अनेक लोकप्रतिनिधींनी आपल्या विश्वासातल्या माणसांना उद्योजकांच्या रांगेत बसवून दिले; परंतु मतदारसंघातला बेरोजगार युवक हा बेरोजगार राहिला असल्याचे चित्र आहे. त्यामुळे आगामी विधानसभेत मतदारांनी बेरोजगारीचा मुद्दा व कार्यकर्त्यांनी लावून धरलेल्या मुद्यावर लक्ष केंद्रित केले. बेरोजगारी व स्थानिक उमेदवारीचे समीकरण राजकीय समीकरणावर रामबाण उपाय ठरला, तर संतरज्या बनविण्यासारखे अनेक उद्योग या मतदारसंघात येऊ शकतात, हे उघड सत्य आहे.

Web Title: Carpet industry slow down; Unemployment increased!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.