आगार व्यवस्थापक, निरीक्षकाविरुद्ध वाहकाच्या पत्नीची पोलिसांत तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:23 AM2021-08-22T04:23:15+5:302021-08-22T04:23:15+5:30
छाया मुगुटराव चावरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, पती मुगुटराव नागोराव चावरे हे आगारमध्ये रुजू झाल्यापासून दोन महिन्यांनंतर तणावात होते. त्यांना ...
छाया मुगुटराव चावरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, पती मुगुटराव नागोराव चावरे हे आगारमध्ये रुजू झाल्यापासून दोन महिन्यांनंतर तणावात होते. त्यांना विचारणा केली असता आगार व्यवस्थापक व निरीक्षक हेतुपुरस्सर नेहमी लांबची ड्यूटी लावत त्रास देत होते. माझ्या पतीने व्याजाने पैसे काढून त्यांची पूर्तता केली. या त्रासापायी माझ्या पतीने दि.१९ ऑगस्ट रोजी विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यांना अकोला येथे खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यांना आयसीयूमधून बाहेर काढले असता त्यांनी सर्व सांगितले. त्यामुळे या दोघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी छाया चावरे यांनी तक्रारीतून केली आहे.
-------------------
घटनेची माहिती मिळाली असता मानवतेच्या दृष्टिकोनातून सर्वतोपरी प्रयत्न करून त्यांना रुग्णालयात भरती केले. त्यांच्यावर घटनेपूर्वी झालेल्या कार्यवाहीबाबतीत वरिष्ठांकडून निलंबनाचे पत्र आले होते. तक्रार दाखल केली असल्याचे अद्याप मला माहिती नाही.
-संतोष वानरे,
आगार व्यवस्थापक, तेल्हारा