राष्ट्रीय महामार्गावर कारची दुचाकीस धडक; एक ठार, एक गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2018 05:55 PM2018-09-09T17:55:51+5:302018-09-09T17:57:39+5:30
बोरगाव मंजू (जि. अकोला): भरधाव कारने दुचाकीस धडक दिल्याने एक जण ठार, तर एक जण गंभीर जखमी झाला. ही घटना राष्ट्रीय महामार्गावर वाशिंबानजिक ९ सप्टेंबर रोजी दुपारी घडली.
बोरगाव मंजू (जि. अकोला): भरधाव कारने दुचाकीस धडक दिल्याने एक जण ठार, तर एक जण गंभीर जखमी झाला. ही घटना राष्ट्रीय महामार्गावर वाशिंबानजिक ९ सप्टेंबर रोजी दुपारी घडली. दिनेश केशव सुरडकर (३०) रा. वाशिंबा असे मृतक युवकाचे नाव आहे, तर भारत विश्वनाथ उपराळे रा. डोंगरगाव असे जखमी युवकाचे नाव आहे.
वाशिंबा येथील दिनेश सुरडकर व डोंगरगाव येथील भारत उपराळे हे दुचाकी क्रमांक एम. एच. ३० ए.के. १०५७ ने डोंगरगाव येथे जात होते. दरम्यान, राष्टÑीय महामार्गावर वाशिंबानजिक अकोल्याकडून येत असलेल्या कार क्रमांक एम. एच. ४८ पी. १८४३ ने त्यांच्या दुचाकीस जबर धडक दिली. या अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच पो. कॉ. अरुण मदनकर, सामाजिक कार्यकर्ते राजेश वानखडे यांनी जखमीस उपचारार्थ सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान, दिनेश सुरडकर याचा मृत्यू झाला. अपघातानंतर कार उलटल्याने त्यातील दोघे किरकोळ जखमी झाले. ठाणेदार विजय मगर यांच्या मार्गदर्शनात पोलीस कर्मचारी शशिकांत पाटील, संजय इंगळे, गजेंद्र मानेवाघ, लक्ष्मण आंबेकर, गवई यांनी घटनास्थळावर धाव घेऊन विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत केली. दरम्यान, वृत्त लिहिस्तोर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. पुढील तपास ठाणेदार विजय मगर यांच्यासह पोलीस करीत आहेत. (वार्ताहर)