व्यंगचित्रकलेला प्रोत्साहन देण्यासाठी रविवारी अकोल्यात व्यंगचित्र स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 03:02 PM2018-01-19T15:02:51+5:302018-01-19T15:09:16+5:30
अकोला : यावर्षी वर्षी ही स्पर्धा रविवार, २१ जानेवारी रोजी सकाळी ९.३० ते १०.३० या वेळेत श्री समर्थ पब्लिक स्कूल, बारा ज्योर्तीलिंग मंदीर जवळ, रणपीसे नगर, अकोला येथे संपन्न होईल.
अकोला : व्यंगचित्र कलेबद्दल ओढ निर्माण व्हावी व व्यंगचित्रकलेशी संबंधीत वातावरण मिळावे या उद्देशाने व्यंगचित्रकार गजानन घोंगडे दरवर्षी व्यंगचित्र स्पर्धा व प्रदर्शनीचे आयोजन करतात. स्पर्धेचे हे विसावे वर्ष असून, यावर्षी वर्षी ही स्पर्धा रविवार, २१ जानेवारी रोजी सकाळी ९.३० ते १०.३० या वेळेत श्री समर्थ पब्लिक स्कूल, बारा ज्योर्तीलिंग मंदीर जवळ, रणपीसे नगर, अकोला येथे संपन्न होईल. स्पर्धेत अ,ब,क असे तीन गट ठेवण्यात आले असुन ‘अ’ गटामध्ये वर्ग ५ ते ७ मधील विद्यार्थी भाग घेवू शकतील तर ‘ब’ गटात वर्ग ८ ते १० मधील विद्यार्थी भाग घेवू शकतील. ‘क’ गट खुला गट आहे. या गटात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपासून ते ज्यांना व्यंगचित्राची आवड आहे अशा सर्व वयोगटातील स्पर्धक भाग घेवू शकतात.
स्पर्धेचे विषय वेळेवर जाहीर करण्यात येतील. व्यंगचित्र काढण्याकरीता स्पर्धकाला सकाळी ९.३० ते १०.३०असा एक तासाचा कालावधी देण्यात येईल. स्पर्धा आटोपल्या नंतर लगेच दुपारी चित्रांचे परिक्षण करून स्पधेर्चा निकाल व बक्षिस वितरणाचा कार्यक्रम स्पर्धेच्या ठिकाणी सायंकाळी ४ वाजता विशेष अतिथींच्या उपस्थितीत संपन्न होईल. विजेत्या व निवडक व्यंगचित्रांचे तसेच काहीं मान्यवर व्यंगचित्रकारांच्या व्यंगचित्रांचे प्रदर्शन ठेवण्यात येईल. विजेत्या स्पर्धकांना बक्षिसांमध्ये स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येईल. कलेची आवड असणाºया, क्रिएटीव्ह मुलांना यात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन मिळावे म्हणून सातत्याने एकोणवीस वषार्पासून आयोजित केली जाणारी ही देशातली एकमेव स्पर्धा असल्याचे गजानन घोंगडे यांनी सांगितले. स्पर्धेत यशस्वी झालेल्या अनेक मुलांनी कलाक्षेत्रात मोठे नाव कमावले देश-विदेशात अनेक मुलं उत्तम काम करीत आहेत आर्थिकदृष्टया यशस्वी आहेत. मागील २ वर्षांपासून सर्वाधिक विद्यार्थी सहभाग असणाºया शाळांना राम क्रिएशन तर्फे रु.१००० (प्रथम), रु.७०० (द्वितीय) व रु ५०० (तृतीय), अशी बक्षिसे देण्यात येत आहेत. व्यंगचित्रकलेला उत्तेजन मिळावे म्हणून आपण सुरू केलेल्या या उपक्रमाला सर्व शाळांनी, विद्यार्थ्यांनी, मागील वर्षी प्रमाणेच भरभरून प्रतिसाद द्यावा व व्यंगचित्र कलेचा प्रसार करण्याची ही चळवळ यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन स्पर्धेचेआयोजक गजानन घोंगडे यांनी केले आहे.