परमबीर सिंग यांच्यासह २७ पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2021 01:39 AM2021-04-29T01:39:56+5:302021-04-29T06:41:26+5:30

सिटी कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल करून ठाणे पोलिसांकडे केला वर्ग

A case of atrocity has been registered against 27 police officers including Parambir Singh | परमबीर सिंग यांच्यासह २७ पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

परमबीर सिंग यांच्यासह २७ पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

Next

अकोला : मुंबई व ठाण्याचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यासह २७ पोलिस अधिकाऱ्यांविरुद्ध अकोल्यातील सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात बुधवारी रात्री उशिरा ॲट्रॉसिटी ॲक्टसह विविध २२ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा दाखल करून प्रकरण ठाणे पोलिसांकडे वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.

ठाणे शहर पोलिस आयुक्तपदी असताना परमबीर सिंग यांनी हजारो कोटींचा भ्रष्टाचार केल्याची तक्रार ज्येष्ठ पोलीस निरीक्षक भिमराज घाडगे यांनी पोलिस महासंचालक तसेच  लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस महासंचालक यांच्याकडे केली आहे. या सोबतच परमबीर सिंग यांच्यासह २७ पोलिस अधिकाऱ्यांनी भिमराज घाडगे यांना जातीवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार भिमराज घाडगे यांनी सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात दिली. यामध्ये पराग मनेरे, संजय शिंदे, सुनील भारद्वाज, विजय फुलकर या चार पोलिस उपायुक्तांच्या डझनभर पोलिस अधिकार्‍यांचा समावेश असल्याची माहिती समोर येत आहे. 

या तक्रारीवरून सिटी कोतवाली पोलिसांनी माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्याविरुद्ध ॲट्रॉसिटी ऍक्ट अन्वये गुन्हा दाखल केला आहे. मुंबई व ठाण्याचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्यासह तब्बल २७ पोलिस अधिकाऱ्यांविरुद्ध ॲट्रॉसिटी ऍक्ट अन्वये गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा दाखल करून प्रकरण ठाणे पोलिसांकडे वर्ग करण्यात येणार असून या प्रकरणाचा तपास आता ठाणे पोलिसांकडून करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.

परमबीर सिंग यांच्याविरुद्ध पहिला गुन्हा दाखल

मुंबई व ठाण्याचे माजी पोलीस आयुक्त तसेच माजी गृहमंत्र्यांवर १०० कोटींचा हप्ता मगितल्याचा आरोप करणारे परमबीर सिंग यांच्याविरुद्ध अकोल्यातील सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात पहिला गुन्हा दाखल झाला आहे. भीमराज घाडगे यांच्या तक्रारीवरून परमबीर सिंग यांच्याविरुद्ध आणखी काही गुन्हे दाखल होणार असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. त्यामध्ये भ्रष्टाचारासह जातीवाचक शिवीगाळ व अन्य काही गंभीर प्रकरणांचा समावेश असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

Read in English

Web Title: A case of atrocity has been registered against 27 police officers including Parambir Singh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.