समृद्धी महामार्गावरील खुणा हटविल्याप्रकरणी गुन्हा दाखल

By Admin | Published: January 21, 2017 02:47 AM2017-01-21T02:47:58+5:302017-01-21T02:47:58+5:30

माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांच्यासह १४ शेतक-यांवर गुन्हा दाखल

In the case of deletion of marks on the Samrudhiyi highway, the crime was filed | समृद्धी महामार्गावरील खुणा हटविल्याप्रकरणी गुन्हा दाखल

समृद्धी महामार्गावरील खुणा हटविल्याप्रकरणी गुन्हा दाखल

googlenewsNext

डोणगाव (बुलडाणा), दि. २0- डोणगाव परिसरातील आंधृड शिवारातील समृद्धी महामार्गाच्या खूणा १९ जानेवारीला माजी राज्यमंत्री सुबोध सावजी व शेतकर्‍यांनी नारेबाजी करून हटविल्या प्रकरणी २0 जानेवारी रोजी डोणगाव पोलिस स्टेशनला माजी मंत्री सुबोध सावजी व अन्य १३ शेतकर्‍यांविरूद्ध गुन्हा दाखल केला.
समृद्धी महामार्गावरील खुणा हटवून सरकारी मालमत्तेचे नुकसान केले तसेच जिल्हाधिकारी बुलडाणा यांचा बुलडाणा जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू असताना एकत्रित जमून कायदाचा भंग केल्याचा आरोप बुलडाणा उपअभियंता रविंद्र पाटील यांनी दिलेल्या तक्रारीत केला आहे. याप्रकरणी डोणगाव पोलिसांनी १४ जणांविरूध्द भादवी ४३४, मुंबई पोलिस अधिनियम १३५ व सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

Web Title: In the case of deletion of marks on the Samrudhiyi highway, the crime was filed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.