हाॅटेल व्हीएस इम्पेरियलच्या अग्रवालविरुध्द गुन्हा दाखल
By सचिन राऊत | Published: March 29, 2024 10:27 PM2024-03-29T22:27:02+5:302024-03-29T22:27:41+5:30
शुभम डेकाेरेटर्सचे संचालक रविंद्र शर्मा आत्महत्या प्रकरण, पाेलिसांकडून आराेपीचा नागपूरात शाेध
अकाेला : हाॅटेल व्हीएस इम्पेरियल येथे अधिकृत व्हेंडर असलेल्या शुभम डेकाेरेटर्सचे संचालक रविंद्र शर्मा यांनी हाॅटेल व्हीएस इम्पेरियलचे संचालक विनाेद अग्रवाल यांच्या मानसीक छळामूळे तसेच वारंवार कमीशन मागणे व गार्डनसाठी लावलेले ३० ते ४० लाख रुपयांची रक्कम न दिल्यामूळे आत्महत्या केल्याची तक्रार झाल्यानंतर पाेलिसांनी विनाेद अग्रवाल याच्याविरुध्द गुरुवारी रात्री उशीरा गुन्हा दाखल केला आहे.
हाॅटेल व्हीएस इम्पेरियलचे संचालक विनाेद महावीरप्रसाद अग्रवाल रा. राधाकीसन प्लाॅट यांनीच रविंद्र मदनलाल शर्मा यांचे शुभम डेकाेरेटर्स यांना हाॅटेल व्हीएस येथे अधिकृत व्हेंडर नेमले हाेते. त्यानंतर शर्मा यांनी या ठिकाणी पुर्ण गार्डन तयार केले. विविध आकर्षक झाड स्वताच्या खर्चाने लावले व देखरेख व मेंटनन्स करीत हाेते. यासाठी सुमारे ३० ते ४० लाख रुपयांचा खर्च रविंद्र शर्मा यांनी स्वता केला. त्यानंतर या ठिकाणी लग्ण, रिसेप्शन, साक्षगंध, पार्टी कींवा अशा प्रकारचा काेणताही कार्यक्रम झाला तर त्याची रक्कम हाॅटेल व्हीएस इम्पेरियलचे संचालक अग्रवाल स्वताजवळ घ्यायचे. शर्मा यांनी त्यांच्या डेकाेरेशनसह विविध बाबींवर केलेला कार्यक्रमातील खर्च व भाडयाची रक्कम मागीतली. तर अग्रवाल त्यांना विविध कारण समाेर करीत पैसे देण्यास नकार देत हाेते अशी तक्रार त्यांची पत्नी आरती शर्मा यांनी डाबकी राेड पाेलिस ठाण्यात केली. विनाेद अग्रवाल यांनी घटनेच्या तीन दिवसांपुर्वी पतीसाेबत चांगलाच वाद घातला हाेता. त्यामुळे प्रचंड मानसीक दडपणात आलेल्या रविंद्र शर्मा यांनी आत्महत्येसारखे टाेकाचे पाउल उचलल्याची तक्रार त्यांच्या पत्नीने केल्यानंतर डाबकी राेड पाेलिसांनी विनाेद महाविरप्रसाद अग्रवाल याच्याविरुध्द भारतीय दंड विधानाच्या कलम ३०६, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या आराेपीचा पाेलिस शाेध घेत असल्याची माहीती आहे.
काढून टाकण्याची दिली वारंवार धमकी
विनाेद अग्रवाल याने रविंद्र शर्मा यांना हाॅटेल व्हीएस इम्पेरियलमधून काढून टाकण्याची धमकी दिली. लग्णात खुर्ची कमी आहे, साफसफाइ याेग्य नाही, असे विविध कारण समाेर करीत त्यांना काढण्याची वारंवार धमकी देत हाेते. एवढेच नव्हे तर गार्डनसाठी केलेला खर्च, लग्णाचे, रिसेप्शनचे भाडेही अग्रवाल स्वताजवळ ठेवत हाेते. पैसे मागीतले तर वाद घालून पैसे देण्यास टाळाटाळ करीत हाेते. याच कारणामुळे रविंद्र शर्मा यांनी आत्महत्या केल्याचा आराेप त्यांच्या पत्नीने केला आहे.