शिवसेनेचे माजी आमदार संजय गावंडे यांच्यावर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:17 AM2021-04-19T04:17:02+5:302021-04-19T04:17:02+5:30

अकोट : अकोट मतदारसंघाचे शिवसेनेचे माजी आमदार संजय गावंडे यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सहसचिवास मारहाण केल्याप्रकरणी दिलेल्या फिर्यादीनुसार, ...

A case has been registered against former Shiv Sena MLA Sanjay Gawande | शिवसेनेचे माजी आमदार संजय गावंडे यांच्यावर गुन्हा दाखल

शिवसेनेचे माजी आमदार संजय गावंडे यांच्यावर गुन्हा दाखल

Next

अकोट : अकोट मतदारसंघाचे शिवसेनेचे माजी आमदार संजय गावंडे यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सहसचिवास मारहाण केल्याप्रकरणी दिलेल्या फिर्यादीनुसार, शहर पोलिसांनी गुन्हे दाखल करून संजय गावंडे यांना अटक केली. या प्रकरणात दि. १८ एप्रिल रोजी माजी आमदार संजय गावंडे यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश दिल्याने त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

पोलीस अपराध पत्रानुसार, येथील बाजार समिती कार्यालयात दि.१७ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजेदरम्यान

बाजार समिती सहसचिव विनोद रमेश कराळे सहकारी कर्मचाऱ्यांसोबत काम करीत होते. यावेळी माजी आमदार संजय गावंडे हे तेथे आले. गावंडे यांनी तुम्ही ड्यूटी करीत नाही, लोकांना त्रास देता, असे म्हणून बाजार समिती सहसचिवास शिवीगाळ करीत मारहाण केली, तसेच यापुढे नागरिकांची कामे वेळेवर नाही केलीत, तर नोकरी करणे मुश्कील करेल, अशी धमकी दिली. घटनेची माहिती बाजार समिती सभापती भारतीताई गावंडे व सचिव राजकुमार माळवे यांना दिल्यानंतर सभापती, सचिव यांनी पोलीस स्टेशनला कायदेशीर तक्रार देण्यास सांगितले. बाजार समितीचे सहसचिव विनोद कराळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, शहर पोलिसांनी संजय गावंडे यांच्याविरुद्ध भा.दं.वि.च्या कलम ३६३, २९४, ३२३, ५०६ कलमान्वये गुन्हा दाखल केला. या प्रकरणात दि.१८ एप्रिल रोजी पोलिसांचा मोठा ताफा अंबिकानगरातील माजी आमदार संजय गावंडे यांच्या निवासस्थानी पोहोचला होता. सशस्त्र पोलिसांसह आलेल्या पथकाने घराला वेढा दिल्यागत परिस्थितीत गावंडे यांना ताब्यात घेऊन अटक केली. संजय गावंडे यांना न्यायालयात हजर केले असता, माजी आमदार संजय गावडे यांनी स्वतःच न्यायालयीन प्रक्रियेत भाग घेत खोटा गुन्हा दाखल केल्याचे सांगत जामीन घेण्यात नकार दिला. न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश दिल्याची माहिती ॲड. अविनाश अग्रवाल यांनी दिली. यावेळी पोलीस निरीक्षक संतोष महल्ले यांच्यासह इतर पोलीस अधिकारी, राज्य राखीव दलाची तुकडी, पोलीस कर्मचारी, असा बराच मोठा बंदोबस्त तैनात होता. न्यायालयाच्या आदेशानुसार संजय गावंडे यांची अकोला जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली. न्यायालयात सरकारी वकील म्हणून जयकुमार गावंडे, ॲड. आर.बी. अग्रवाल, ॲड. अविनाश अग्रवाल यांनी काम पाहिले.

------------------

शेतकऱ्यांना योग्य वागणूक न देता कर्मचारी काम करीत नाहीत. याबाबत विचारपूस करायला गेलो असता, सहसचिवाने उडवाउडवीची उत्तरे देत अरेरावी केली. त्यांच्यासोबत केवळ बाचाबाची झाली असून, मी मारहाण केली नाही. शिवाय सरकारी कामात अडथळा आणला नाही. तरीसुद्धा मद्यधुंद अवस्थेत सहसचिव पोलिसांत गेले. त्यांची वैद्यकीय तपासणी न करताच माझ्यावर एकतर्फी खोटा गुन्हा दाखल केला असून, खरे-खोटे समोर येईलच.

-संजय गावंडे, माजी आमदार, अकोट मतदारसंघ

Web Title: A case has been registered against former Shiv Sena MLA Sanjay Gawande

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.