विनापरवाना मिरवणूक काढल्याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:33 AM2021-03-04T04:33:12+5:302021-03-04T04:33:12+5:30
लोहारा गावातील हजरत मस्तानशाह बाबा (र.अ) यांचा १ मार्च रोजी दरवर्षी संदल कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. मात्र यावर्षी जिल्ह्यामध्ये ...
लोहारा गावातील हजरत मस्तानशाह बाबा (र.अ) यांचा १ मार्च रोजी दरवर्षी संदल कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. मात्र यावर्षी जिल्ह्यामध्ये कोरोनाचा संसर्ग असल्याने पोलीस प्रशासनाने मिरवणुकीची परवानगी नाकारली होती. असे असतानाही गावातील आरोपी अहेफाज नईम देशमुख याने १०० ते २०० लोकांचा बेकायदेशीररीत्या जमाव गोळा करून गावातून ढोलताशांच्या गजरात मिरवणूक काढली. पोलिसांना माहिती मिळताच, पोलीस पथक गावात पोहचले. मात्र आरोपींनी पळ काढला. याप्रकरणी ठाणेदार अंतराव वडतकर यांच्या तक्रारीनुसार लोहारा येथील अयफाज नईम देशमुख याच्यासह मिरवणुकीत सहभागी झालेल्या आरोपींविरुद्ध भादंवि कलम २६९, १८८ नुसार गुन्हा दाखल केला.
आरोपीकडून शिवीगाळ
उरळ : कोरोनामुळे मिरवणुकीस विरोध करणाऱ्या व्यक्तीस आरोपी अहेफाज नईम देशमुख याने अश्लील शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. १ मार्च रोजी सायंकाळी मस्तान शाह बाबा ट्रस्ट अध्यक्ष याकूब हमजा देशमुख हे चौकात उभे असताना आरोपीने त्यांना धमकावले. उरळ पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला.